कॅनरा बँकेतून सहा लाख लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 01:07 IST2018-10-13T01:04:12+5:302018-10-13T01:07:40+5:30

कल्याण : तीन भामट्यांनी पश्चिमेतील शिवाजी चौकातील कॅनरा बँकेच्या कॅश काउंटरमधून सहा लाखांची रोकड लंपास केल्याची घटना गुरुवारी सकाळी ...

Six lakh rupees stolen from Canara Bank | कॅनरा बँकेतून सहा लाख लंपास

कॅनरा बँकेतून सहा लाख लंपास

कल्याण : तीन भामट्यांनी पश्चिमेतील शिवाजी चौकातील कॅनरा बँकेच्या कॅश काउंटरमधून सहा लाखांची रोकड लंपास केल्याची घटना गुरुवारी सकाळी ११.३० ते १२ वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी रोखपालाच्या तक्रारीवरून महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.


बँकेत सहा अनोळखी व्यक्ती आल्या होत्या. त्यातील एकाने हत्यारधारी सुरक्षारक्षक प्रवीण पवार यांना एटीएममधून पैसे निघत नसल्याचे सांगत त्यांना तळ मजल्यावर नेले. दोन ते तीन व्यक्तींनी कॅश काउंटर नंबर-३ समोर उभे राहून लवकर पेमेंट करा किती उशीर लावताय, असे सांगून कर्मचाऱ्यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. एका व्यक्तीने कॅश काउंटर केबिनच्या मागील उघड्या दरवाजावाटे केबिनमध्ये प्रवेश करत बाबुराव देवकर या रोखपालाच्या नकळत दोन हजार रुपयांच्या रकमेची तीन बंडले लंपास केली.

Web Title: Six lakh rupees stolen from Canara Bank