ठाणे : सार्वजनिक रोडवर पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्याने त्यातील बॅग लांबवल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. त्या चोरीला गेलेल्या बॅगेत पाच जिवंत काडतुसे लोडेड रिव्हॉल्व्हरसह अन्य सात काडतुसे आणि सहा लाखांची रोकड असा सुमारे सात लाखांचा ऐवज गेल्याचे तक्रारीत नमूद असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.ठाणे वर्तकनगर येथील माणिकचंद कीर्तिकर (६२) हे व्यावसायिक असून वर्तकनगर येथील येडोबा जनसेवा या संस्थेचे विश्वस्त आहेत. कीर्तिकर यांना त्यांच्या संस्थेसाठी नवी रुग्णवाहिका घ्यावयाची असल्याने ते रुग्णवाहिका पाहण्यासाठी गुरु वारी सायंकाळी ६.४५ वाजेच्या सुमारास नितीन कंपनीजवळील सर्व्हिस रोड येथे आपल्या कारने पत्नी व मुलीसह आले. दरम्यान, कीर्तिकर हे कार रस्त्याच्या कडेला उभी करून रुग्णवाहिका बघण्यास हेरिटेज मोटर्स येथे गेले असताना त्यांच्या कारची डावीकडील मागील दरवाजाची काच फ ोडून चोरट्याने कारमधील बॅग चोरून नेली. त्या बॅगेत सहा लाखांची रोकड, ८५ हजार रु पयांची परवाना असलेली पाच काडतुसे लोडेड रिव्हॉल्व्हर, अन्य सात जिवंत कडतुसे व पासपोर्ट असा एकूण सहा लाख ९२ हजार २०० रु पये किमतीचा ऐवज होता. असे कीर्तिकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आवारे करत आहेत.
ठाण्यात लोडेड रिव्हॉल्व्हरसह सहा लाखांची रोकड चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 20:19 IST
ठाणे : सार्वजनिक रोडवर पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्याने त्यातील बॅग लांबवल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. त्या चोरीला गेलेल्या बॅगेत पाच जिवंत काडतुसे लोडेड रिव्हॉल्व्हर सह अन्य सात काडतुसे आणि सहा लाखांची रोकड असा सुमारे सात लाखांचा ऐवज गेल्याचे तक्रारीत नमूद असल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.ठाणे वर्तकनगर येथील माणिकचंद ...
ठाण्यात लोडेड रिव्हॉल्व्हरसह सहा लाखांची रोकड चोरीला
ठळक मुद्देचोरट्याने कारमधील बॅग चोरून नेलीअन्य सात जिवंत कडतुसे व पासपोर्ट