उल्हासनगरतील मुलींच्या बाल सुधारगृहातून सहा मुलींचे पलायन, दोन सापडल्या, चार मुलींचा पोलिसांकडून शोध सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 21:13 IST2025-08-29T21:12:58+5:302025-08-29T21:13:16+5:30

सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्हे

Six girls escape from a girls' juvenile correctional home in Ulhasnagar | उल्हासनगरतील मुलींच्या बाल सुधारगृहातून सहा मुलींचे पलायन, दोन सापडल्या, चार मुलींचा पोलिसांकडून शोध सुरु

उल्हासनगरतील मुलींच्या बाल सुधारगृहातून सहा मुलींचे पलायन, दोन सापडल्या, चार मुलींचा पोलिसांकडून शोध सुरु

सदानंद नाईक 
उल्हासनगर: कॅम्प नं-५, येथील शासकीय बाल सुधारगृहातून ६ अल्पवयीन मुली पळून गेल्याची धक्कादायक घटना उघड झाली. सहा पैकी दाेन मुलींचा शोध पोलिसांनी घेतला असून इतर चार मुलीचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे यांनी दिली.

 उल्हासनगर कॅम्प नं-५, येथे शासकीय मुलीचे बालसुधारगृह असून या बालगृहातून मुली पळून जाण्याच्या घटना वारंवार घडत आहे. बुधवारी दुपारी दोन ते तीन वाजताच्या दरम्यान शासकीय बालसुधार गृहातून एकूण ६ अल्पवयीन मुली अचानक बेपत्ता झाल्याची घटना उघड झाली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात शासकीय बालसुधारगृहाच्या तक्रारीवरून मिसिंगचा गुन्हा दाखल झाला. पळून गेलेल्या मुलींनी मुख्य प्रवेशद्वारची चावी कुठून तरी मिळवून मेन गेट उघडून मुलींनी पलायन केले. या प्रकरणाने शासकीय बालसुधारगृहाच्या सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर आला. सहा पैकी २ मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले असून पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या मुलींच्या शोधासाठी शोथ पथके नेमली गेली. 

हिललाईन पोलिसांना दोन मुलीना त्यांच्या मिराभाईंदर येथील राह्त्या घरी मिळून आली. या सहा मुली मिराभाईंदर, ठाणे व मुंबईतील आहेत. घटनेच्या दिवशी बुधवारी या सहा पैकी काही मुली मेन गेटची चावी असलेल्या रुममध्ये गेल्या व चावी काढली. यावेळी तैनात असलेले सुरक्षा रक्षक हे जेवण करीत होते. याच संधीचा फायदा घेत चावी घेऊन गेट उघडून पळून गेल्या. ज्या दोन मुली पोलिसांना सापडल्या. त्यांनी सांगितले की, त्यांना या सुधारगृहात राहायचे नाही. अजून चार मुलांचा शोध सुरु आहे. त्यांचाही लवकरच शोध घेतला जाणार असल्याची प्रतिक्रिया वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे यांनी दिली.

Web Title: Six girls escape from a girls' juvenile correctional home in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.