शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
7
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
8
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
9
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
10
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
11
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
12
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
13
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
14
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
15
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
16
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
17
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
18
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
19
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
20
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क

सिग्‍नल शाळेचे विद्यार्थी बनले आरटीओचे सदिच्‍छादूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2020 13:02 IST

पोलिसी गणवेशात रस्‍ता सुरक्षा नियमांबाबत करणार जनजागृती

ठळक मुद्देसिग्‍नल शाळेचे विद्यार्थी बनले आरटीओचे सदिच्‍छादूत पोलिसी गणवेशात रस्‍ता सुरक्षा नियमांबाबत करणार जनजागृतीआरटीओ आणि रोटरी क्‍लब ऑफ ठाणे सनराईजचा पुढाकार

ठाणे - तीन हात नाका सिग्‍नलवर कधीकाळी भीक मागणारी म्‍हणून ओळखली जाणारी मुले सिग्‍नल शाळेमुळे शिक्षणाच्‍या मूळ प्रवाहात आली आणि आता त्‍याच सिग्‍नलवर ही मुले आरटीओचे सदिच्‍छादूत म्‍हणून वाहन धारकांना रस्‍ता सुरक्षा नियमांबद्दल जनजागृती करणार आहेत. विशेष म्‍हणजे या मुलांना आरटीओने त्‍यासाठी पोलिसांसारखा विशेष गणवेश दिला असुन रविवार सकाळी सात वाजताच्‍या कार्यक्रमात मुलांना हा गणवेश देऊन त्‍यांना रस्‍ता सुरक्षा अभियानाचे सदिच्‍छादूत म्‍हणून जबाबदारी देण्‍यात येणार आहे.

महाराष्ट्रातील परिवहन विभागातील प्रादेशिक कार्यालय ठाणे आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे सनराईज यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत विविध उपक्रम घेतला जात आहे. रस्ता सुरक्षा नियमांबद्दल जनजागृती होण्यासाठी ठिकठिकाणी बॅनर्स, प्लॅकार्ड लावले जातात. परंतु अनेकवेळा रस्‍ता सुरक्षा अभियान केवळ औपचारिकता होऊन जाते व ते वाहनधारकांच्‍या मनाला भिडत नाही. हीच कमतरता दूर करण्यासाठी आरटीओ ठाणे आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे यांनी मिळून एक कल्पक योजना आखली. त्यानुसार या  दोघांनी मिळून वाहनचालकांना, पादचाऱ्यांना रस्ता सुरक्षा नियम पाळण्याबाबतचे शुभेच्छा पत्र वाटप करायचे ठरवले आहे. या शुभेच्छा पत्रात वाहतूक प्रसंगानुरूप चित्रे जे विनोदी, भावनिक असतील, तसेच दुसऱ्या बाजूस रस्ता सुरक्षा नियम असतील. हा उपक्रम ठाणे मुंबईला जोडणाऱ्या तीन हाथ नाका सिग्नल येथे दर मंगळवारी सकाळी नऊ वाजता केला जाणार आहे. याचा शुभारंभ रविवार सकाळी सात वाजता वॉकेस्‍थॉनच्‍या माध्‍यमातुन ठाणे लुईसवाडी आरटीओ येथून होणार असुन मुलांना सदिच्‍छादूत म्‍हणून जाहिर करण्‍याचा कार्यक्रम होणार आहे.

रस्‍ता सुरक्षा अभियानासाठी तीन हात नाका, ठाणे येथील सिग्नल स्कूल विद्यार्थ्यांची सदिच्छादूत म्हणून निवड केली आहे. आरटीओ अधिकारी अपर्णा पाटने याबाबत म्‍हणाल्‍या की, या विद्यार्थ्यांची निवड करण्यामागचे कारण असे आहे की हे विद्यार्थी सिग्नल जवळ राहतात. त्यांची शाळा सुद्धा सिग्नल जवळ आहे. रस्ता सुरक्षाचे उल्लंघन होताना ते नेहमी बघतात. असे उल्लंघन करू नका असे सांगतील तेव्हा लोकांवर अधिक परिणामकारक ठरतील असे आम्हाला वाटते. सततच्या हॉर्नच्या आवाजामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात व्यत्यय होत असते, जेव्हा हे विद्यार्थी हॉर्न वाजवू नका, आमच्या अभ्यासात व्यत्यय आणू नका असे लोकांना वारंवार सांगतील तेव्हा आम्हाला खात्री आहे, कि शुभेच्छा घेणारे नागरिक एक न एक दिवस सिग्नल स्कूलच्या जागेवर आल्यावर आपसूकच हॉर्न वाजवणे थांबवतील. 

आम्हाला रस्ता सुरक्षेचे नियम हे संस्कारांमध्ये, वर्तणुकीमध्ये उतरावयाचे आहे. उपक्रमाच्या सातत्यामुळे हा परिणाम आम्हाला साधता येईल असा आमचा विश्वास आहे असे त्‍यांनी सांगितले. सिग्‍नल शाळेच्‍या मुलांना पोलिसी गणवेशाचे नेहमीच अप्रूप राहिले आहे. अनेक मुलांना पो‍लीस होण्‍याचे स्‍वप्‍न आहे. या उपक्रमामुळे त्‍यांच्‍यात आत्‍मविश्‍वास जागृत होईल. त्‍याबरोबर रस्‍ता सुरक्षाच्‍या अभियानात देखील त्‍यांना हातभार लावता येईल अशी प्रति‍क्रिया सिग्‍नल शाळेच्‍या प्रकल्‍प प्रमुख आरती परब यांनी व्‍यक्‍त केली आहे.  

टॅग्स :thaneठाणेTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसStudentविद्यार्थी