धक्कादायक! अनैतिक संबंधाच्या संशयावरून कोयत्याने वार करून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 22:42 IST2020-02-13T22:37:33+5:302020-02-13T22:42:35+5:30
आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून भरतसिंग राजपुरोहित याच्यावर कोयत्याने वार करुन खूनाचा प्रयत्न करणाऱ्या शिवाजी कुरणे याला चितळसर पोलिसांनी बुधवारी अटक केली.

धक्कादायक! अनैतिक संबंधाच्या संशयावरून कोयत्याने वार करून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : अनैतिक संबंधाच्या संशयावरून भरतसिंग राजपुरोहित (३५) यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करणाºया शिवाजी कुरणे (४८) याला चितळसर पोलिसांनी बुधवारी रात्री अटक केली आहे. आपल्या पत्नीशी भरतसिंगचे अनैतिक संबंध असावेत, असा कुरणेला संशय होता.
धर्मवीरनगर येथे राहणारे भरतसिंग हे १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास मुंबई येथे जाण्यासाठी ठाण्यातील वसंतविहार येथील बसथांब्यावर उभे होते. त्यावेळी तिथे आलेल्या शिवाजी याने त्याच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन भरतसिंग यांच्या डोक्यावर, खांद्यावर आणि दोन्ही हातांवर कोयत्याने वार केले. या हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या भरतसिंग याला वाचवण्यासाठी पुढे सरसावलेल्या एका रिक्षाचालकावरही शिवाजीने हल्ला केला. नंतर मात्र काही रिक्षाचालकांनी त्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. हा हल्ला करण्याच्या आधीही शिवाजीने त्याला याच संशयातून ११ फेब्रुवारी रोजी फोनवरून ठार मारण्याची धमकी दिली. या धमकीनंतर १२ फेब्रुवारी रोजी तो वसंतविहार येथे उभा असताना पाठीमागून येऊन त्याने अचानक भरतसिंगवर कोयत्याने वार केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांच्या पथकाने हल्लेखोर शिवाजीला १२ फेब्रुवारी रोजी अटक केली आहे.