धक्कादायक! खारेगाव येथील मोटारसायकल अपघातात वाशिंदच्या तरुणाचा मृत्यु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 22:07 IST2020-09-21T22:06:39+5:302020-09-21T22:07:31+5:30

मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातामध्ये मोटारसायकलस्वार संदीप सुपडू पाटील (३४) या वासिंदच्या तरुणाचा मृत्यु झाल्याची घटना रविवारी रात्री घडली.

Shocking! Washind's youth dies in motorcycle accident in Kharegaon | धक्कादायक! खारेगाव येथील मोटारसायकल अपघातात वाशिंदच्या तरुणाचा मृत्यु

कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा

ठळक मुद्दे कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातामध्ये संदीप सुपडू पाटील (३४, रा. वाशिंद, ता. मुरबाड) हा मोटरसायकल चालक गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यु झाल्याची घटना रविवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
खारेगाव टोल नाक्याजवळल मुंबई नाशिक मार्गावरील नाशिकच्या दिशेने २० सप्टेंबर रोजी रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास संदीप हे मोटारसायकलवरुन जात होते. त्याचवेळी त्यांचे मोटारसायकलवरील नियंत्रण सुटल्याने ते खाली कोसळले. यात डोक्याला मार लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्याच एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. चालकाच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळेच त्यांचा जागीच मृत्यु झाल्याचे पोलिसांनी सांगितले. या रस्त्यावर असलेल्या खड्डयांमुळेच याठिकाणी अपघातांची मालिका सुरुच असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. हे रस्ते दुरुस्तीसाठी महामार्ग विभागाने तातडीने पुढाकार घ्यावा, अशी मागणीही येथील स्थानिक रहिवाशांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Shocking! Washind's youth dies in motorcycle accident in Kharegaon