Shocking! Two killed in truck collision in Thane | धक्कादायक! ठाण्यात ट्रकच्या धडकेने दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू
नौपाडा पोलिसांनी केला ट्रक जप्त

ठळक मुद्देट्रकचालकास अटकनौपाडा पोलिसांनी केला ट्रक जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुंबई-अहमदाबाद पूर्व द्रुतगती मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर तीनहातनाका येथील उड्डाणपुलावर एका मालवाहू ट्रकने दिलेल्या धडकेत प्रतीक गणत्रा (२३, रा. मुलुंड) आणि प्रशांत घाडगे (२२, रा. मुलुंड) यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री ९.२५ वाजता घडली. याप्रकरणी ट्रकचालक मुकेशकुमार पटेल (३०, रा. वैजलपूर, गुजरात) याला नौपाडा पोलिसांनी शुक्रवारी पहाटे अटक केली.
प्रतीक आणि प्रशांत हे दोघे २३ जानेवारीला रात्री ९.३० वाजता मोटारसायकलवरून ठाण्यात आले होते. मुंबई-नाशिक मार्गावरून तीनहातनाका येथील उड्डाणपुलावरून जात असताना भरधाव वेगाने जाणाºया पटेल याच्या ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना नौपाडा पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक मोहिनी कपिले यांच्या पथकाने तातडीने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात या दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पटेल याला २४ जानेवारीला पहाटे २ वाजता अटक केली. त्याचा ट्रकही जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

Web Title: Shocking! Two killed in truck collision in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.