धक्कादायक! ठाण्यात जेवणाच्या उधारीवरुन मित्रानेच केला मित्राचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 23:33 IST2020-10-15T23:31:37+5:302020-10-15T23:33:33+5:30

जेवण्याच्या उधारीवरून झालेल्या वादातून आशू छोटेलाल बर्मन (२५) या मित्रानेच राजू पटेल उर्फ सुदामा (२६) या मित्राची हत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील कासारवडवली भागात घडली. यातील आरोपीला लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

Shocking! In Thane, a friend killed his friend on loan for a meal | धक्कादायक! ठाण्यात जेवणाच्या उधारीवरुन मित्रानेच केला मित्राचा खून

कासारवडवलीतील घटना

ठळक मुद्दे कासारवडवलीतील घटनाखूनानंतर आरोपीचे पलायन

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: सफाई काम करणाऱ्या दोघा मित्रांची दुपारच्या जेवण्याच्या उधारीवरून वाद झाला. याच वादातून आशु छोटेलाल बर्मन (२५) या मित्रानेच राजू पटेल उर्फ सुदामा (२६) या मित्राची हत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील कासारवडवली भागात घडली. या प्रकरणी कासावाडवली पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
घोडबंदर रोड येथील साईनाथ अपार्टमेंटमध्ये राजू पटेल, प्रेम शशिकांत वाघमारे (२६) आणि आशु छोटेलाल बर्मन (२५) हे सफाईचे काम करीत होते. त्यात राजू हा जिथे मिळेल, तिथे रस्त्यावर वास्तव्य करीत असे. त्यात गुरु वारी दुपारी राजू आणि आशु यांच्यात जेवणाचे उधार राहिलेल्या पैशावरून साईनाथ अपार्टमेंटच्या मागील बाजूस वाद झाला. याचाच राग मनात धरून आश याने राजूच्या डोक्यावर लाकडी दांडक्याने मारहाण केली. यात राजूच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्याला तातडीने प्रेम याने ठाणे जिल्हा शासकीय रु ग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच राजूचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात आशु छोटेलाल याच्याविरु द्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Shocking! In Thane, a friend killed his friend on loan for a meal