धक्कादायक ! ठाण्यात मोटारसायकलीच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 20:25 IST2020-12-30T19:35:02+5:302020-12-30T20:25:07+5:30
मोटारसायकलीच्या धडकेमध्ये विजय सातदिवे (३६, रा. पातलीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे) या पादचाºयाचा मृत्यु झाल्याची घटना शनिवारी घडली.

कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मोटारसायकलीच्या धडकेमध्ये विजय सातदिवे (३६, रा. पातलीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे) या पादचाºयाचा मृत्यु झाल्याची घटना शनिवारी घडली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात सोमवारी अज्ञात मोटारसायकल स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सातदिवे हे २७ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११.१५ वाजण्याच्या सुमारास गायमुख येथून जाणाºया मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरुन घोडबंदर रोडने पायी जात होते. त्याचवेळी भरघाव वेगाने आलेल्या एका दुचाकीस्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. यात जमिनीवर पडून डोक्याला ,पाठीवर आणि कानाला मार लागून ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा २८ डिसेंबर रोजी मृत्यु झाल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले.