धक्कादायक! वडिलांना शिव्या दिल्या म्हणून केली मित्राची हत्या
By कुमार बडदे | Updated: February 7, 2023 18:30 IST2023-02-07T18:28:42+5:302023-02-07T18:30:14+5:30
दारुच्या नशेत मित्राने वडिलाना शिव्या दिल्या म्हणून त्याची हत्या केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री तीन वाजता मुंब्रा शहरा जवळील भोलेनाथ नगर परीसरातील बुद्धविहाराच्या मागे असलेल्या डोगरा जवळ घडली.

धक्कादायक! वडिलांना शिव्या दिल्या म्हणून केली मित्राची हत्या
मुंब्राः दारुच्या नशेत मित्राने वडिलाना शिव्या दिल्या म्हणून त्याची हत्या केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री तीन वाजता मुंब्रा शहरा जवळील भोलेनाथ नगर परीसरातील बुद्धविहाराच्या मागे असलेल्या डोगरा जवळ घडली. येथील अमजद खान (वय २३)आणि निलेश कांबळे (वय २४) हे दोन्ही मित्र रात्री नशा करण्यासाठी घटनास्थळी गेले होते. तेथे खान याने कांबळे याच्या वडिलाना शिविगाळ केली.
यामुळे संतप्त झालेल्या कांबळे याने खान याच्या डोक्यावर बाबूने तसेच छातीवर दगडाने प्रहार करुन केले. यात गंभिर जखमी झाल्याने त्याचा घटनास्थळावर मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन कायदेशीर बाबीची पूर्तता करुन शवविच्छेदनासाठी कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवला.
आरोपी कांबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरु असल्याची माहिती शिळ-डायघर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गावडे यांनी दिली.