धक्कादायक! ठाण्यात लग्नाचे अमिष दाखवून मेैत्रिणीवर लैंगिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 00:22 IST2020-06-04T00:13:52+5:302020-06-04T00:22:40+5:30

लग्नाच्या अमिषापोटी आपल्याच मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या राबोडीतील अफताब सय्यद याच्याविरुद्ध सोमवारी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये त्याने ठाणे तसेच वसई आणि विरार अशा वेगवेगळया ठिकाणी तिच्याशी शरीरसंबंध ठेवल्याचेही तिने तक्रारीत म्हटले आहे.

Shocking! girl friend sexually abused in Thane by Boyfriend | धक्कादायक! ठाण्यात लग्नाचे अमिष दाखवून मेैत्रिणीवर लैंगिक अत्याचार

राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ठळक मुद्देराबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलमारहाण करीत ठार मारण्याचीही दिली धमकी

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: लग्नाचे अमिष दाखवून आपल्याच २१ वर्षीय मैत्रिणीवर गेल्या सहा महिन्यांपासून लैंगिक अत्याचार करणाºया अफताब सय्यद (२१, रा. राबोडी, ठाणे) याच्याविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा सोमवारी दाखल झाला आहे. याप्रकरणी तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
एकाच ठिकाणी कामावर असल्यामुळे पिडित तरुणीची अफताब सोबत मैत्री झाली होती. याच मैत्रीतून ते एकमेकांच्या जवळ आले होते. यातूनच त्याने तिला लग्नाचे अमिष दाखविले. याच अमिषापोटी त्याने राबोडीतील त्याच्या घरी, घोडबंदर रोडवरील एका हॉटेलवर तसेच वसई आणि विरार अशा वेगवेगळया ठिकाणी तिच्याशी शरीरसंबंध ठेवले. तिने लग्नाबाबत विचारणा केल्यानंतर मात्र त्याने तिला मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच तिला ठार मारण्याचीही धमकी दिली. हा प्रकार नोव्हेंबर २०१९ ते मे २०२० या सहा महिन्यांपासून सुरु होता. या सर्व प्रकाराला कंटाळून या पिडितेने अखेर याप्रकरणी १ जून रोजी राबोडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचार, मारहाण, शिवीगाळ करणे आणि धमकी दिल्याबाबत तक्रार दाखल केली आहे. याप्रकरकणी चौकशी सुरु असून आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांनी सांगितले.

Web Title: Shocking! girl friend sexually abused in Thane by Boyfriend