धक्कादायक ! बदलपुरात शेतकऱ्याला किटकनाशक पाजून हत्येचा प्रयत्न, शेतक-याचा उपचारादरम्यान मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 13:10 IST2017-10-06T13:10:13+5:302017-10-06T13:10:59+5:30
जमिनीच्या वादातून दत्तू बनकर या शेतकऱ्याला किटकनाशक पाजून जिवे मारण्यात आल्याची धक्कादायक आहे. बदलापूरजवळील राहटोली गावातील ही घटना आहे.

धक्कादायक ! बदलपुरात शेतकऱ्याला किटकनाशक पाजून हत्येचा प्रयत्न, शेतक-याचा उपचारादरम्यान मृत्यू
बदलापूर - जमिनीच्या वादातून दत्तू बनकर या शेतकऱ्याला किटकनाशक पाजून जिवे मारण्यात आल्याची धक्कादायक आहे. बदलापूरजवळील राहटोली गावातील ही घटना आहे. या प्रकरणात बदलापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (5 ऑक्टोबर) हा सर्व प्रकार घडला. या शेतका-याला उपचारांसाठी मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
दत्तू बनकर हे नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळही शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्यानंतर काही मिनिटातच ते घरी परत आले. कारण शेतात असताना कुणीतरी त्यांच्या तोंडावर कपडा टाकत जबरदस्तीने त्यांना जमिनीवर पाडले व त्यांना किटकनाशक पाजलं. याप्रकरणी त्यांची पत्नी कमला बनकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. दरम्यान, खासगी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करुन बनकर यांच्या शरीरातील किटकनाशक बाहेर काढण्यात आले. मात्र प्रकृतीत सुधारण होत नसल्यानं पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेबाबत दत्तू बनकर यांच्या मुलाला विचारले असता, जमिनीच्या एका प्रकरणात अंबरनाथ तहसिलदार यांच्यासमोर सुनावणी झाली होती. त्यात निकाल आमच्या बाजूने लागल्याने समोरच्या पक्षाने हा हल्ला केल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे जमिनीच्या वादातूनच हा प्रकार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.