शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेतील सत्तासंघर्ष शिगेला

By admin | Updated: December 25, 2015 02:27 IST

महापौर संजय मोरे यांच्याविरोधात माजी महापौर अशोक वैती यांनी वेगवेगळ्या कारणांमुळे उघडलेली मोहीम चर्चेत असतानाच आता काही नगरसेवकांनीही महापौरांविरोधात बाह्या

अजित मांडके,  ठाणे महापौर संजय मोरे यांच्याविरोधात माजी महापौर अशोक वैती यांनी वेगवेगळ्या कारणांमुळे उघडलेली मोहीम चर्चेत असतानाच आता काही नगरसेवकांनीही महापौरांविरोधात बाह्या सरसावल्या आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना डावलून ही मोहीम थेट ‘मातोश्री’च्या दारात नेण्यात आल्याने शिवसेनेतील अंतर्गत खदखद, असंतोष चव्हाट्यावर आला आहे. हा वाद असाच तापला तर अप्रत्यक्षरीत्या सुरू असलेली ‘महापौर हटाव’ मोहीम जोर पकडेल, असा शिवसैनिकांचा अंदाज आहे.काही दिवसांपासून शिवसेना नगरसेवकांत अंतर्गत ठिणग्या पडत असतांनाच काही ठरावीक नगरसेवकांचीच कामे होत असल्याचे कारण पुढे करीत महापौर आणि शिवसेनेच्याच काही नगरसेवकांमध्ये कलगीतुरा रंगू लागला आहे. माजी महापौर अशोक वैती यांनी सत्ताधारी शिवसेनेला जाहीररीत्या घरचा आहेर देण्यास सुरुवात केल्याने शिवसेनेतील हा संघर्ष शिगेला पोहोचण्याची चिन्हे आहेत.अवघ्या दीड वर्षात ठाणे पालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्यावर लक्ष देत भाजपने शिवसेनेच्या कामांवर नजर ठेवत त्यातील काही कामांचे श्रेय घेण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. ते लक्षात घेऊन शिवसेनेनेही कुरघोडीचा प्रयत्न सुरू केला. भाजप पालिका निवडणूक स्वबळावर लढवेल, हे सप्ष्ट आहे. त्यामुळे युतीतील हे दोन्ही पक्ष सत्तासंघर्षात उतरतील, असे मानले जात असतानाच शिवसेनेतच अंतर्गत संघर्ष पेटू लागला आहे. > नगरसेवकही आक्रमकआगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला शह देण्याच्या नादात शिवसेनेतील अंतर्गत कुरघोड्या वाढू लागल्याने वरिष्ठ नेतेही हैराण झाले आहेत. त्यांनी काहींची मनधरणी सुरू केली आहे, तर काहींना शिवसेना स्टाइलमध्ये दम भरण्यासही सुरुवात केली आहे. त्याच वेळी शिवसेनेतील काही मंडळींनी महापौरांनाच टार्गेट करण्यास सुरुवात केल्याने महापौर विरुद्ध शिवसेनेचे नगरसेवक असा सत्तासंघर्ष तापल्याचे दिसते.