शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना - भाजपात रस्त्यावरून श्रेयवादाची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 23:30 IST

एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप; वर्तकनगर पोलीस वसाहतीच्या पुनर्विकासाचा मुद्दा, नगरसेवकांमध्ये जुंपली

ठाणे : वर्तकनगर पोलीस वसाहतीच्या पुनर्विकासाच्या मुद्यावरून सध्या शिवसेना आणि भाजपाच्या आमदरामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे. त्यात आता ती नगरसेवकांमध्येही सुरू झाली आहे. चरई मधील लाजरस रोड रस्ता बांधणीच्या मुद्यावरूनही बुधवारी शिवसेना आणि भाजपाच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपल्याचे दिसल. मागील तीन वर्षे या रस्त्याची आम्ही प्रयत्न केले त्यानंतर तो तयार झाला. परंतु, भाजपाने त्याचे उद्घाटन करून आमचे श्रेय लाटल्याचा आरोप शिवसेनेच्या नगरसेवकाने केला. तर हे श्रेय आमच्याच नगरसेवकांचे असल्याचा दावा भाजपाने केला.चरई मधील लाझरस रोड दगडी शाळा ते कांदबरी बिर्ल्डिंगपर्यंतच्या रस्त्याचे युटीडब्ल्युटी पद्धतीने काँक्रिटीकरणास शिवसेनेचे नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी तीन वर्षे प्रयत्न केल्याचा दावा केला. परंतु, बुधवारी सकाळी भाजपाने त्याचे उद्घाटन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करून त्याठिकाणी वचनपूर्तीचा फलक लावला. त्यामुळे संतप्त झालेल्या कोकाटे यांनीसुद्धा त्याठिकाणी फलक लावून त्यावर तीन वर्षांपासून पाठपुरावा केल्यानेच हा रस्ता झाल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे आता या रस्त्यावरूनन शिवसेना विरुद्ध भाजपा असा संघर्ष पेटला असून आम्ही जी कामे करीत आहोत, त्याचे श्रेय भाजपाचे आमदार घेत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. येथील उड्डाणपुलाचा मुद्दा असो किंवा पथदिव्यांचा विषय असो या सर्वांचे श्रेय घेण्याचा डाव काही दिवसांपासून केळकर यांच्या माध्यमातून सुरू असल्याचा आरोप कोकाटे यांनी केला आहे. उद्घाटन केले असते तर मी काही बोललो नसतो. परंतु,बॅनर लावून त्यांनी चुक केल्याचेही त्यांनी सांगितले.या संदर्भात भाजपाचे नगरसेवक संजय वाघुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मुळात प्रभाग २१ साठी ही या रस्त्याची निविदा निघाली होती. या प्रभागात भाजपाचेच नगरसेवक आहेत. परंतु, कोकाटे यांच्या प्रभागातील काही इमारती या उजव्या बाजूला येत आहेत. त्या येत असल्या तरी निविदा प्रभाग २१ साठी मंजूर झाली असल्याने त्याठिकाणी श्रेय घेण्याची शिवसेनेला गरजच नसल्याचे खडेबोल त्यांनी सुनावले.निवडणुकीत पडसादवर्तकनगर येथील पोलीस वसाहतीच्या श्रेयवादाची लढाई आता रस्त्यापर्यंत आली आहे. दोन्ही पक्ष हा मुद्दा कितपत गांभीर्याने घेतात, यावर बरेच काही अवलंबून आहे. अन्यथा आगामी विधानसभा निवडणुकीत याचे पडसाद उमटणे निश्चित आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाthaneठाणे