शिवाजीराव शिंदे जिल्हा सहकारी पतसंस्था अध्यक्ष

By Admin | Updated: May 12, 2017 01:42 IST2017-05-12T01:42:14+5:302017-05-12T01:42:14+5:30

ठाणे जिल्हा नागरी-पगारदार सहकारी पतसंस्था फेडरेशनची पंचवार्षिक निवडणूक शुक्रवारी झाली. यात अध्यक्षपदी शिवाजीराव

Shivajirao Shinde District Co-operative Credit Society President | शिवाजीराव शिंदे जिल्हा सहकारी पतसंस्था अध्यक्ष

शिवाजीराव शिंदे जिल्हा सहकारी पतसंस्था अध्यक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे जिल्हा नागरी-पगारदार सहकारी पतसंस्था फेडरेशनची पंचवार्षिक निवडणूक शुक्रवारी झाली. यात अध्यक्षपदी शिवाजीराव शिंदे यांची बिनविरोध फेरनिवड झाली. श्रेणी १चे सहकार अधिकारी रविंद्र पाटील यांनी निवडणूक अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. अध्यक्षपदाच्या या बिनविरोध निवडीसह अन्यही सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यास सहकारी पतसंस्था फेडरेशनचे संचालक मंडळ यशस्वी झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने उपाध्यक्षपदी डॉ. शामराव पाटील, सचिव वसंत पिसाळ, खजिनदार रमेश चव्हाण या पदाधिकाऱ्यांसह संचालकपदी शिवदास गुरव, विलास निकम, मनोहर पाटील, बाबासाहेब दगडे, विजय विचारे, जानबा पाटील, युवराज यादव यांचीही बिनविरोध निवड झाली. तर या संचालक मंडळावर नवनिर्वाचित संचालक म्हणून उर्मिला प्रभुघाटे, हेमांगी जोशी यांचीही बिनविरोध निवड झाली.

Web Title: Shivajirao Shinde District Co-operative Credit Society President