शिवसेनेच्या मंजुषा जाधव यांचा ठाणे जि.प.अध्यक्ष पदाचा राजीनामा; सेनेचा अंतर्गतवाद चव्हाट्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 18:16 IST2019-07-16T18:10:53+5:302019-07-16T18:16:05+5:30
जिल्हा परिषदेवर शिवसेना व राष्टÑवादीची सत्ता आहे. एक आठवड्यापूर्वी विषय समित्यांच्या चार सभापतींची निवड झाली. त्यात भाजपाला देखील एक सभापती देत जिल्हा परिषदेच्या या सत्तेत सहभागी करून घेतले. या सभापती निवडीच्या वेळी देखील अध्यक्ष म्हणून जाधव यांना विचारात घेतले नसल्याची चर्चा आहे. त्यास अनुसरून सेनेतील अंतर्गत वाद विकोपाला जावून जाधव यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे जावून जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. या वृत्ता अनुसरून त्यांना विचारले असता राजीनामा दिल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले

ठाणे जिल्हा परिषदेच्या (जि.प.) अध्यक्षा मंजुषा जाधव यांनी अखेर कोकण विभागीय आयुक्तांकडे अध्यक्ष पदाचा राजीनामा
ठाणे : शिवसेनेतील अंतर्गत वादास कंटाळूनठाणेजिल्हा परिषदेच्या (जि.प.) अध्यक्षा मंजुषा जाधव यांनी अखेर सोमवारी संध्याकाळी कोकण विभागीय आयुक्तांकडे अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या राजीनाम्यामुळे शिवसेनेच्या ग्रामीण भागातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. या रिक्त अध्यक्ष पदासाठी लवकरच निवड हाती घेतली जाणार असून त्यासाठी भिवडीच्य वाफे येथील दिपाली पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.
जिल्हा परिषदेवर शिवसेना व राष्ट्रावादीची सत्ता आहे. एक आठवड्यापूर्वी विषय समित्यांच्या चार सभापतींची निवड झाली. त्यात भाजपाला देखील एक सभापती देत जिल्हा परिषदेच्या या सत्तेत सहभागी करून घेतले. या सभापती निवडीच्या वेळी देखील अध्यक्ष म्हणून जाधव यांना विचारात घेतले नसल्याची चर्चा आहे. त्यास अनुसरून सेनेतील अंतर्गत वाद विकोपाला जावून जाधव यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे जावून जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. या वृत्ता अनुसरून त्यांना विचारले असता राजीनामा दिल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. अध्यक्ष व सभापती यांनी सव्वा सव्वा वर्ष सत्तेवर राहण्याची बोली झाली होती. त्यामुळे जाधव यांनी राजीनामा दिल्याचे शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांकडून पक्षाची बाजू सावरात सांगितले जात आहे.
जिल्हा परिषदेच्या या दीड वर्षाच्या सत्ता कालावधीत ग्रामीण भागातील शिवसेनेमध्ये सतत अंतर्गत वाद ऐकायला मिळाला. लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी युतीचे भाजपा उमेदवार खासदार कपील पाटील यांच्या विरोधात बंड करून प्रचार केल्यामुळे शिवसेनेने त्यांच्यावर कारवाई करून सेनेच्या संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा घेतला. यानंतर निश्चित केल्या प्रमाणे सभापतीचा कार्यकाळ संपला म्हणून म्हात्रे यांनी सभापतीचा राजीनामा दिला. त्या पाठोपाठ सेनेसह राष्ट्रावादीच्या प्रत्येकी दोन सभापतींनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतरही ग्रामीण भागातील शिवसैनिकांमधील वाद अखेर खदखदत असतानाच त्याचे पर्यावसन जाधव यांच्या अध्यक्ष पदाच्या राजीनाम्यात झाले.
आगामी विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या असतानाच जिल्ह्यात सध्यास्थितीला शिवसेना, राष्ट्रावादीच्या फोडाफोडीलाही प्रारंभ झाला आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रावादीचे शहापूर येथील आमदार पांडुरंग बरोरा यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या शिवसेना प्रवेशाने मंजुषा जाधव नाराज असल्याचे ऐकायला मिळाला. यामुळे त्यांनी सोमवारी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. शहापूर विधानसभा युतीतील मित्रपक्ष शिवसेनेच्या उमेदवारासाठी भाजपाने सोडलेली आहे. यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी जाधव यांची निवडणूक लढवण्याची इच्छा असल्याचे सांगितले जात आहे. पण आता विद्यमान आमदार बरोरा यांचा पक्षात प्रवेश झाल्यामुळे शिवसेना त्यांना उमेदवारी देणार असल्याची चाहूल लागताच जाधव यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची ही जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे. तर बरोरा सेनेत गेल्यामुळे राष्ट्रावादी देखील शहापूरसाठी तगड्या उमेदवाराच्या शोधात आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री व राष्ट्रावादीचे जेष्ठ नेते अजित पवार १७ जुलैरोजी शहापूरात मोठा मेळावा घेणार आहे. या मेळाव्याच्या मुहूर्तावर जाधव राष्ट्रावादीत प्रवेश करून विधानसभेची निवडणूक लढवणार की तटस्त राहाणार याकडे मात्र आता सर्वांचे लक्ष लागून आहे.