तानसा- वैतरणा नदीला पूर; ठाणोसह पालघर जिल्ह्यातील काठावरील 75 गावांना सर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 06:56 PM2019-07-15T18:56:34+5:302019-07-15T19:03:11+5:30

तानसा आणि मोडकसागर या दोन्ही धरणांव्दारे मुंबई महापालिकेला पाणी पुरवठा केला जात आहे. या धरण क्षेत्रत पावसाचा जोर असल्यामुळे ते लवकरच भरून वाहण्याच्या स्थितीत आहेत. तानसा नदीवर तानसा धरण शहापूर तालुक्यातील तानसा गावाजवळ आहे.

Flood of Tansa-Vaitarna river; Circulating with Thanos to 75 villages on the edge of Palghar district | तानसा- वैतरणा नदीला पूर; ठाणोसह पालघर जिल्ह्यातील काठावरील 75 गावांना सर्कतेचा इशारा

वैतरणा नदीवरील मोडकसागर धरण व तानसा नदीवरील तानसा धरण लवकरच भरण्याची शक्यता

googlenewsNext
ठळक मुद्देतानसा धरणाची ओसंडून वाहण्याच्या पातळीची क्षमता  128.62 मी.टीएचडी मोडक सागर धरणाची ओसंडून वाहण्याची क्षमता 163.147 मी.टीएचडीनदीच्या पुरामुळे काठावरील गावाना धोका संभवण्याची शक्यता

ठाणो : वैतरणा नदीवरील मोडकसागर धरण व तानसा नदीवरील तानसा धरण लवकरच भरण्याची शक्यता आहे. यामुळे या दोन्ही नदींच्या पात्रत पाणी सोडण्यात येणार असल्यामुळे नदीला पूर  येणार आहे. यापासून नदी काठावरील गावाना धोका उद्भवू नये म्हणून  ठाणो व पालघर जिल्ह्यात सुमारे 75 गावपाडय़ांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
     तानसा आणि मोडकसागर या दोन्ही धरणांव्दारे मुंबई महापालिकेला पाणी पुरवठा केला जात आहे. या धरण क्षेत्रत पावसाचा जोर असल्यामुळे ते लवकरच भरून वाहण्याच्या स्थितीत आहेत. तानसा नदीवर तानसा धरण शहापूर तालुक्यातील तानसा गावाजवळ आहे. या धरणाची पाण्याची पातळी 126.781 मिमी टीएचडी आहे. म्हणजे या धरणात 415.95 फूट टीएचडी पाणी आहे. या धरणाची ओसंडून वाहण्याच्या पातळीची क्षमता  128.62 मी.टीएचडी आहे. धरणात 422 फूट पाणी साठा होताच हे धरण भरून वाहणार आहे. यामुळे या वैतरणा नदीच्या काठावरील ठाणो जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामधील 19 गावाना व पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यामधील 15 गावाना पुराच्या पाण्याचा धोका संभवतो. यावर वेळीच उपाययोजना म्हणून प्रशासनाने या दोन्ही जिल्हह्यातील 33 गावातील नागरिकांना व प्रशासकीय अधिका:याना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.     

 वैतरणा नदी काठावर मोडक सागर धरण आहे. शहापूर तालुक्यातील खर्डी गावाजवळ असलेल्या या धरणाच्या पाण्याची पातळी सध्या 160.842 मी.टीएचडी आहे. तर  527.70 फूट टीएचडी पाणी या धरणात आहे. या धरणाची ओसंडून वाहण्याची क्षमता 163.147 मी.टीएचडी आहे.  या धरण क्षेत्रत पावसाचे प्रमाण पहाता लवकरच मोडकसागर धरण पूर्ण भरून वाहण्याची शक्यता आहे.यामुळे नदी पात्रत पाणी वाढून पूर सदृश्य स्थिती निर्माण होणार आहे. या वैतरणा नदीच्या पुरामुळे काठावरील 42 गावाना धोका संभवण्याची शक्यता आहे. यावर वेळीच उपाययोजना म्हणून वाडा तालुक्यातील  24 गावे. तर पालघर तालुक्यातील 18 गावपाय़ांना सतर्क राहण्याचा ईशारा मुंबई महानगरपालिकेने जारी केला आहे. 
    

Web Title: Flood of Tansa-Vaitarna river; Circulating with Thanos to 75 villages on the edge of Palghar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.