दिव्यात भाजपला पुन्हा धक्का; १५ दिवसांत दुसरा दिवा मंडळ अध्यक्ष करणार शिवसेनेत प्रवेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 13:30 IST2022-02-15T13:29:50+5:302022-02-15T13:30:44+5:30

तत्कालीन भाजप दिवा मंडळ अध्यक्ष आदेश भगत यांनी स्व. आनंद दिघे यांच्या जयंतीदिनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

Shiv Sena's jerk to BJP in diva again; In 15 days, another Diva Mandal president will join Shiv Sena | दिव्यात भाजपला पुन्हा धक्का; १५ दिवसांत दुसरा दिवा मंडळ अध्यक्ष करणार शिवसेनेत प्रवेश 

दिव्यात भाजपला पुन्हा धक्का; १५ दिवसांत दुसरा दिवा मंडळ अध्यक्ष करणार शिवसेनेत प्रवेश 

ठाणे : काही दिवसांपूर्वी दिवा मंडळ अध्यक्षपदी विराजमान झालेले भाजप शहर उपाध्यक्ष निलेश पाटील हे आपल्या पत्नी अर्चना पाटील यांच्यासह हजारो पदाधिकाऱ्यांसह (आज) मंगळवारी दुपारी शिवसेना भवन येथे शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ते लवकरच तेथे दाखल होतील. दिव्यात भाजपला १५ दिवसांत शिवसेनेने हा दुसरा धक्का दिला आहे. तो ही दिवा मंडळ अध्यक्ष आहे.

तत्कालीन भाजप दिवा मंडळ अध्यक्ष आदेश भगत यांनी स्व. आनंद दिघे यांच्या जयंतीदिनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. भगत सेनेत जाणार असल्याची कुणकुण लागल्याने एक दिवस आधीच भाजप जिल्हाध्यक्षक तथा आमदार निरंजन डावखरे यांनी निलेश पाटील यांची दिवा मंडळ अध्यक्ष पदी निवड करून त्यांना नियुक्ती पत्रही एक छोटा कार्यक्रम घेऊन दिले होते.

मात्र त्याला १५ दिवस होत नाहीत, तोच दिव्यात भाजपला धक्का देण्यात शिवसेना यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे. मंगळवारी पाटील हे हजारो भाजप पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश करत आहे. याबाबत त्यांनी स्वतः दुजारो दिला आहे.
 

Web Title: Shiv Sena's jerk to BJP in diva again; In 15 days, another Diva Mandal president will join Shiv Sena