शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

पालिकेच्या ‘माऊली’वरील कारवाईमुळे भाषिक वाद पेटला, मराठी फेरीवाल्यांवरच कारवाई होत असल्याचा शिवसेनेचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 6:38 PM

मराठी फेरीवाल्यांवर कारवाई करताना परप्रांतिय फेरीवाल्यांवर कारवाई न झाल्याने मीरा-भाईंदर शहरात भाषिक वाद पेटला आहे.

 भार्इंदर - मीरारोड येथील प्रभाग समिती ४ अंतर्गत असलेल्या रामदेव पार्क मधील फेरीवाल्यांवर बुधवारी झालेल्या कारवाईवेळी शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यांची ‘माऊली’ नामक पावभाजी हातगाडी जेसीबीने तोडण्यात आली. त्यावेळी तेथील परप्रांतिय फेरीवाल्यांवर कारवाई न झाल्याने शहरात भाषिक वाद पेटला आहे. या विरोधात शिवसेनेसह स्वाभिमान संघटना व मराठी एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने अतिरीक्त आयुक्त माधव कुसेकर यांना गुरुवारी घेराव घालीत मराठी फेरीवाल्यांपुरती मर्यादित असलेल्या कारवाईची चौकशी करुन प्रभाग अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. 

शहरात फेरीवाल्यांचा प्रश्न जटील बनला असला तरी त्याचे पुनर्वसन नवीन बाजाराच्या वास्तूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. नवीन बाजारात अधिकृत कि अनधिकृत फेरीवाल्यांना सामावून घेणार, हा प्रश्न सध्या उपस्थित झाला असला तरी पालिकेने रामदेव पार्क परिसरात सुरू केलेल्या नवीन बाजारात सत्ताधारी भाजपाच्या स्थानिक नगरसेवकांनी बहुतांशी परप्रांतिय फेरीवाल्यांचा भरणा केल्याचा आरोप सेनेकडून केला जात आहे. तसेच त्यांच्याकडून निश्चित दरापेक्षा अधिक बेकायदेशीर बाजार फी वसूल केली जात असल्याचा गंभीर आरोपही करण्यात येत आहे. यातून मराठी भाषिक तसेच अधिकृत फेरीवाल्यांना डावलल्याचा आरोप करुन आ. प्रताप सरनाईक यांनी त्याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. तुर्तास हे आंदोलन अद्याप झाले नसल्याने मराठी भाषिक फेरीवाल्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. बाजारात पुर्नवसन होऊनही अनेक परप्रांतिय फेरीवाले आजही रस्त्यावरच ठाण मांडत असल्याची चर्चा तत्कालिन महासभेत झाली होती. त्यावर कारवाई करण्याचे सुतोवाच आयुक्तांनी केले होते. त्यानुसार  प्रभाग समिती ४ चे अधिकारी नरेंद्र चव्हाण यांच्या नियंत्रणाखालील पथकाने बुधवारी येथील फेरीवाल्यांवर कारवाई केली. त्यावेळी तेथील शिवसेना शाखेजवळ उपविभागप्रमुख विशाल मोरे व प्रशांत सावंत यांच्या ‘माऊली’ नामक पावभाजीच्या हातगाडीवरच पथकाने कारवाई करीत ती जेसीबीने पुर्णपणे चक्काचूर करण्यात आली. याखेरीज तेथील परप्रांतिय फेरीवाल्यांच्या हातगाडीवर पथकाने कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप मोरे व सावंत यांनी करीत पथकाच्या या एकतर्फी कारवाईची माहिती त्यांनी पक्षाच्या वरीष्ठांना दिली.त्यानुसार सेनेचे उपजिल्हाध्यक्ष शंकर विरकर, विभागप्रमुख प्रकाश मोरे, उपशहरप्रमुख पप्पू भिसे, स्वाभिमान संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप राणे व मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख, कृष्णा जाधव आदींच्या शिष्टमंडळाने गुरूवारी अतिरीक्त आयुुक्तांना घेराव घातला. पालिकेची मराठी भाषिकांपुरती मर्यादित केलेल्या कारवाईची चौकशी करुन प्रभाग अधिकाय््राावर कारवाई करण्याची मागणी शिष्टमंडळाने केली. तसे न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. त्यावर अतिरीक्त आयुक्तांनी सरसकट फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन  शिष्टमंडळाला दिले. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक