भिवंडीतील ट्रॅफिक समस्या सोडवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे वाहतूक पोलीस उपायुक्तांना साकडे
By नितीन पंडित | Updated: January 28, 2023 17:51 IST2023-01-28T17:50:41+5:302023-01-28T17:51:26+5:30
भिवंडीतील वाहतूक कोंडीच्या समस्येतून नागरिकांची सुटका करण्याची विनंती केली.

भिवंडीतील ट्रॅफिक समस्या सोडवण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे वाहतूक पोलीस उपायुक्तांना साकडे
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क
भिवंडी: शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे भिवंडी शहर प्रमुख प्रसाद पाटील यांनी शनिवारी ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त विनय राठोड यांची भेट घेत भिवंडीतील वाहतूक कोंडीच्या समस्येतून नागरिकांची सुटका करण्याची विनंती केली.
भिवंडी तीन आमदार व एक खासदार त्यातही केंद्रीय मंत्री असतानाही भिवंडीतील वाहतूक कोंडीच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नसल्याने आपण स्वतः शिवसैनिकांसह वाहतूक पोलीस उपायुक्तांची भेट घेत शहरातील वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाय योजना उपायुक्तांसमोर नकाशा समोर ठेऊन मांडल्या असून येत्या काही दिवसात आपण स्वतः भिवंडी शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येतून मार्ग काढण्यासाठी शहरात एका बैठकीचे आयोजन करणार असल्याचे आश्वासन वाहतूक पोलीस उपायुक्त विनय राठोड यांनी आपल्याला दिले असून त्यामाध्यमातून लवकरच भिवंडीतील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे अशी प्रतिक्रिया शहर प्रमुख प्रसाद पाटील यांनी दिली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"