शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
4
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
5
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
6
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
7
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
8
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
9
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
10
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
11
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
12
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
13
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
14
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
15
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
16
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
17
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
18
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
19
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
20
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
Daily Top 2Weekly Top 5

बदलापूरच्या कडक लॉकडाऊनला शिवसेनेचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बदलापूर : बदलापूर शहरात शनिवारपासून आठ दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, या लॉकडाऊनला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बदलापूर : बदलापूर शहरात शनिवारपासून आठ दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र, या लॉकडाऊनला शिवसेनेने विरोध केला आहे. बदलापूर शहरातील रुग्णसंख्या कमी होत असताना आता कडक लॉकडाऊनची गरज काय, असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. यासंदर्भात जाब विचारण्यासाठी शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी पालिका कार्यालयात ठाण मांडले होते.

बदलापूर शहरातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन बदलापूर पालिकेने मुरबाड पॅटर्नप्रमाणे सात दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन लागू केला. त्यामध्ये मेडिकल, बँक आणि दवाखाने वगळता इतर सर्व दुकाने आस्थापना बंद करण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. मात्र, शासनाने ब्रेक द चेन मोहिमेंतर्गत सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत दुकानांना परवानगी दिलेली असताना आणि या मोहिमेमुळे शहरातील रुग्णसंख्या कमी होत असताना आता पुन्हा कडकडीत लॉकडाऊन करण्याची गरज काय, असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. लॉकडाऊनला शिवसेनेने विरोध केला आहे. हाच विरोध दर्शवण्यासाठी शिवसेनेचे म्हात्रे हे शनिवारी सकाळपासून बदलापूर पालिकेच्या सभागृहामध्ये ठाण मांडून बसले. मुख्याधिकारी दीपक पुजारी यांनी आमच्या समोर येऊन आम्हाला स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी त्यांनी लावून धरली. मात्र, ही घोषणा गुरुवारी केल्यापासून पुजारी बदलापूर पालिकेत फिरकलेले नाहीत. त्यामुळे जोपर्यंत पुजारी येऊन आम्हाला स्पष्टीकरण देत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, अशी भूमिका म्हात्रे यांनी घेतली आहे.

..........

आ. किसन कथोरे यांनी साधला शिवसेनेवर निशाणा

बदलापूर शहरात कडकडीत लॉकडाऊन लावण्यात आला असून, शिवसेनेने याला विरोध केला आहे. यावरून आता मुरबाड विधानसभेचे भाजपचे आमदार किसन कथोरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. फक्त ठेकेदारी बंद झाली म्हणून लॉकडाऊनला विरोध केला जात असल्याचा आरोप कथोरे यांनी केला.

................

वाचली