उल्हासनगर महापालिका आयुक्तांना शिवसेनेचे साकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 17:57 IST2019-08-01T17:52:39+5:302019-08-01T17:57:15+5:30
आयुक्तांकडून समस्या सोडवण्याचे आश्वासन

उल्हासनगर महापालिका आयुक्तांना शिवसेनेचे साकडे
उल्हासनगर : रस्त्यातील खड्डे, अर्धवट विकास कामे, उद्यानाची दुरावस्था आदी समस्या सोडविण्यासाठी शिवसेना शिष्टमंडळाने आयुक्त सुधाकर देशमुख यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. आयुक्तांनी महापालिकेच्या आर्थिक स्थितीची कल्पना देऊन काम करण्याचे आश्वासन दिले आहे.
संततधार पावसाचे कारण देत रस्त्यातील खड्डे भरण्याचा मुहूर्त महापालिका लागत नसल्याने, ओमी टीम, काँग्रेस, भाजपा पाठोपाठ शिवसेना आक्रमक झाली. आमदार बालाजी किणीकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडरे, विरोधी पक्षनेते धनंजय बोडरे, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी यांनी दुपारी आयुक्त देशमुख यांची भेट घेतली. ५० एम.एल.डी. वाढीव पाणीपुरवठा योजनेची अंमलबजावणी करणे, विकास कामांसाठी आरक्षित असलेले भूखंड ताब्यात घेऊन त्यांच्या बाजूने संरक्षक भिंत किंवा कुंपण उभारणे इत्यादी विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, विरोधी पक्ष नेते धंनजय बोडारे, उपशहरप्रमुख राजेंद्र शाहू, दिलीप गायकवाड, शेरी लुंड, विभागप्रमुख शिवाजी जावळे, ग्राहक कक्षाचे जयकुमार केणे, सुनील सुर्वे, युवा सेना शहर अधिकारी बाळा श्रीखंडे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.