कल्याण - विकासकामाचे श्रेय लाटण्याचा वादातून शिवसेनेच्या दोन नगरसेविका आपापसात भिडल्याची घटना कल्याण पूर्व येथील प्रभाग क्रमांक 98 मध्ये घडली आहे. कल्याण पूर्वेकडील प्रभाग क्रमांक 98 च्या नगरसेविका शितल भंडारी असून याआधी या प्रभागाच्या नगरसेविका माधुरी काळे होत्या. याच परिसरातील एका सोसायटीच्या आवारात विकासकामे केल्याबद्दल नगरसेविका माधुरी काळे यांचे अभिनंदनचा होर्डिंग लावण्यात आले होते. आपल्या प्रभागात दुस-या नगरसविकेचे होर्डिंग पाहून विद्यमान नगरसेविका शितल भंडारी सतापल्या त्यांनी याबाबत माधुरी काळे यांच्याशी बोलण्यास गेले असता दोघींमध्ये वादावादी सुरू झाली. या वादावादीचे रुपांतर नंतर हाणामारीत झालं. दोन्ही नगरसेविकांनी एकमेकांच्या विरोधात कोळसेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
VIDEO: विकासकामाचे श्रेय लाटण्याचा वादातून शिवसेना नागरसेविकांमध्येच राडा, पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 14:49 IST