शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा कल्याणमध्ये दाखल

By Admin | Updated: January 2, 2017 13:20 IST2017-01-02T13:14:44+5:302017-01-02T13:20:37+5:30

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा कल्याणमध्ये दाखल झाला आहे. ढोल-ताशांच्या गजरात बाळासाहेबांच्या पुतळ्याचे स्वागत करण्यात आले.

Shiv Sena chief Balasaheb Thackeray's statue is in Kalyan | शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा कल्याणमध्ये दाखल

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा कल्याणमध्ये दाखल

ऑनलाइन लोकमत 

कल्याण, दि. 2 - गेले वर्षभर सुरू असलेल्या शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे काम पूर्ण झाले असून, हा पुतळा सोमवारी (2 जानेवारी) कल्याणमध्ये दाखल झाला आहे.  ऐतिहासिक काळा तलाव परिसर हे पुतळ्याचे स्मारकस्थळ असणार आहे. कोल्हापूरहून कल्याणमध्ये बाळासाहेबांचा पुतळा दाखल होताच ढोल ताशांचा गजरात त्याचे स्वागत करण्यात आले.  
 
पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर राजेंद्र देवळेकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर यांच्यासह शिवेसेनेचे अनेक नगरसेवक, पदाधिकारी आणि शिवसैनिकही यावेळी मोठ्या प्रमाणात हजर होते.  शिल्पकार संताजी चौगले यांच्या कार्यशाळेत गेल्या एक वर्षापासून या पूर्णाकृती पुतळ्याचे काम सुरू होते. यादरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन, कामाची पाहणी करून योग्य त्या दुरुस्त्याही सुचवल्या होत्या. वर्षभराच्या मेहनतीनंतर हा पुतळा आता तयार झाला आहे.  
(बाळासाहेबांच्या स्मारकाचे जयंतीपूर्वीच होणार लोकार्पण)
 
 
 
 
 

Web Title: Shiv Sena chief Balasaheb Thackeray's statue is in Kalyan