विरोधी पक्षनेते फडणवीसांच्या दौऱ्यावर शिवसेनेचा बहिष्कार? अधिकृत आमंत्रणच दिले नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2020 00:18 IST2020-07-06T00:18:06+5:302020-07-06T00:18:33+5:30
महापौर लीलाबाई अशान यांच्यासह सत्ताधारी पक्षातील एकही नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित नव्हते. अधिकृत आमंत्रण नसल्याने उपस्थित नसल्याची प्रतिक्रिया महापौर अशान यांनी दिली.

विरोधी पक्षनेते फडणवीसांच्या दौऱ्यावर शिवसेनेचा बहिष्कार? अधिकृत आमंत्रणच दिले नाही
उल्हासनगर : माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या रविवारी झालेल्या दौºयावर सत्ताधारी शिवसेनेसह अन्य पक्षांनी अघोषित बहिष्कार घातला होता. महापौर लीलाबाई अशान यांच्यासह सत्ताधारी पक्षातील एकही नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित नव्हते. अधिकृत आमंत्रण नसल्याने उपस्थित नसल्याची प्रतिक्रिया महापौर अशान यांनी दिली.
उल्हासनगरमधील आरोग्य सुविधेचा आढावा घेण्यासाठी फडणवीस, विधान परिषदचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आले होते. त्यांनी शहरातील कोरोना रुग्णालयाला भेट देवून महापालिका आयुक्तांसोबत चर्चा केली. मात्र महापौर यांच्यासह सत्ताधारी पक्षातील एकही नगरसेवक यावेळी उपस्थित नव्हता.
याबाबत महापौर अशान यांना विचारले असता महापौर यांच्यासह अन्य सत्ताधारी पक्षातील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना अधिकृत आमंत्रण दिले नव्हते. भाजपचे नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी मात्र सत्ताधारी पक्षाच्या वागण्यावर टीका
केली.
शहरातील आरोग्य सुविधा सुधारून त्याचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांसाठी व्हावा म्हणून भर पावसात विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्यासह भाजप टीम दौरा करीत आहेत. मात्र सत्ताधारी रस्त्यावर उतरण्या ऐवजी घरात बसून राजकारण करत असल्याचा आरोप रामचंदानी यांनी केला. इतर महापालिकेचे सत्ताधारी व विरोधी पक्षनेते हातात हात घालून कोरोनाचे संकट निवारण्यासाठी काम करीत आहेत.
मात्र शहरात फक्त भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर येऊन नागरिकांच्या समस्या सोडून मदत करीत आहेत, असे रामचंदानी म्हणाले. तर शिवसेना उपशहरप्रमुख अरुण अशान यांनी मात्र रामचंदानी यांचे आरोप फेटाळून, महापालिकेने आमंत्रण दिले असते तर, फडणवीस यांच्या दौºयात सहभागी झालो असतो, अशी प्रतिक्रिया
दिली.