शहरं
Join us  
Trending Stories
1
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
2
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
3
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
4
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
5
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
6
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
7
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
8
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
9
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
10
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
11
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
12
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
13
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
14
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
15
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
16
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
17
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
18
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
19
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...

उदघाटनावरून रंगला श्रेयवाद, शिवसेना, भाजप, समाजवादी पक्ष आमनेसामने

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 1:03 AM

इंदिरा गांधी उपजिल्हा रु ग्णालयातील वर्षभरापासून बंद असलेल्या सिटीस्कॅन मशीन, डायलिसिस व ऑपरेशन थिएटरच्या उद्घाटनावरून शिवसेना-भाजप व समाजवादी पक्षाच्या आमदारांमध्ये वाद उफाळून आला आहे.

भिवंडी - इंदिरा गांधी उपजिल्हा रु ग्णालयातील वर्षभरापासून बंद असलेल्या सिटीस्कॅन मशीन, डायलिसिस व ऑपरेशन थिएटरच्या उद्घाटनावरून शिवसेना-भाजप व समाजवादी पक्षाच्या आमदारांमध्ये वाद उफाळून आला आहे. संतप्त शिवसेना, भाजप कार्यकर्त्यांनी उद्घाटन कार्यक्र माची आमदार रईस शेख व समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्या नावाची कोनशिला तोडली. तसेच मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन मंगळवारी सकाळी आमदार महेश चौघुले यांनी माजी आमदार रूपेश म्हात्रे यांच्या उपस्थितीत उद्घाटन केले. नंतर दुपारी समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आझमी यांच्या हस्ते पुन्हा उद्घाटन केले.या रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्यांना योग्य उपचार मिळत नसल्याने रूग्णांची नेहमीच आरडाओरड होत असते. यारु ग्णालयात शिवसेनेचे माजी आमदार म्हात्रे व चौघुले यांच्या प्रयत्नाने सिटीस्कॅन मशीन, डायलिसिस मशीन विधानसभा निवडणुकीपूर्वीच उपलब्ध झालेल्या होत्या. मात्र, त्यांचा उद्घाटन सोहळा प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे लांबणीवर पडला होता. त्यामुळे येथील नागरिकांनी आमदार रईस शेख यांच्याकडे रु ग्णालयाच्या कारभाराबाबत तक्र ारी केल्या होत्या. त्याची दखल घेत हिवाळी अधिवेशनात रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत निवेदन केले होते. त्यामुळे सरकारने आरोग्य विभागाला हे रुग्णालय सुस्थितीत तयार करण्याचे आदेश दिले होते. रुग्णालयात वर्षभरापासून बंद असलेली ही मशीन व आॅपरेशन थिएटरचे काम पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न आमदार शेख यांनी सुरू केले. त्यासाठी त्यांनी समाजवादीचे अध्यक्ष आझमी यांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्र म ठेवला. या कार्यक्र माची माहिती अथवा निमंत्रण सेना-भाजप आमदारांना न देता तसेच कोनशिलेवर तत्कालीन स्थानिक आमदारांची नावे वगळून कार्यक्र म उरकण्याचा बेत आखला असल्याची माहिती चौघुले यांना मिळताच त्यांनी म्हात्रे व भाजपचे नगरसेवक निलेश चौधरी, श्याम अग्रवाल यांच्यासह मंगळवारी सकाळी रु ग्णालयात धाव घेऊन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल थोरात यांच्या उपस्थितीत उद्घाटन केले.यावेळी उपस्थित असलेल्या व संतप्त झालेल्या शिवसेना, भाजपच्या कार्यकर्त्यांनी भिंतीवर उद्घाटन कार्यक्रमाची लावलेली कोनशिला तोडून टाकली आणि घोषणाबाजी केली. ही घटना समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना समजताच दुपारी त्यांनीही रु ग्णालयात धाव घेऊन पुन्हा या यंत्रसामग्रीचे उद्घाटन करून श्रेय ओढवून घेतले आहे.  नागरिकांच्या सुविधेसाठी केले उद््घाटन : यात राजकारण, श्रेय घेण्याचा प्रश्नच नाहीमी आमदार असताना आॅगस्ट २०१९ मध्ये जिल्हा नियोजन बैठकीत यंत्रसामग्री, आॅपरेशन थिएटर मंजूर करून घेतले होते. तसा निधीही मंजूर केला होता. मात्र डायलिसिस, सिटीस्कॅन चालवण्यासाठी तंत्रज्ञ नसल्याने ते बंद होते. हे सर्व करण्यासाठी मी प्रयत्न केले असल्याने समाजवादी त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप माजी आमदार रूपेश म्हात्रे यांनी केला.इंदिरा गांधी रूग्णालयात झालेला हा कार्यक्रम सरकारी होता, असे आमदार रईस शेख यांनी सांगितले. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कल्पना दिली असता त्यांनी तोंडी परवानगी दिली असे त्यांनी नमूद केले. मी स्वत: उपस्थित असल्याने तो सरकारी कार्यक्रमच होता. नागरिकांना सुविधा मिळावी यासाठी उद््घाटन केले,श्रेय घेण्याचा प्रश्नच नाही असे म्हणाले. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटलbhiwandiभिवंडी