शहरं
Join us  
Trending Stories
1
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
2
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
3
१२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
5
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
6
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
7
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
8
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
9
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
10
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
11
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
12
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
13
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
14
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
15
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
16
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
18
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
19
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
20
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?

शिवसेना-भाजपा युती नैसर्गिक असल्याने तुटणार नाही; महापौरांच्या विधानानं ठाण्यात राजकीय खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2022 11:55 IST

ठाणे : पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे ठाण्यात आघाडीसाठी प्रयत्न करत असताना महापौर नरेश म्हस्के ...

ठाणे : पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे ठाण्यात आघाडीसाठी प्रयत्न करत असताना महापौर नरेश म्हस्के यांनी आपल्या कारर्किदीतील शेवटच्या महासभेत शिवसेना आणि भाजपची युती नैसर्गिक असून आम्ही बाजूला झालो म्हणून नाते तुटत नाही, असे धक्कादायक विधान केले. महापालिका निवडणुकीत कुणासोबत जायचे यावरून शिवसेनेत मतभेद असल्याचे स्पष्ट दिसत आहे. यापूर्वी आ. प्रताप सरनाईक यांनीही ईडीच्या कारवाईनंतर भाजपसोबत युती करण्याची भाषा केली होती. जातो तिथे उपदेश आम्हा सांगतो कोणीतरी कीर्तने सारीकडे…. चोहीकडे ज्ञानेश्वरी काळजी आमच्या हिताची एवढी वाहू नका जाऊ सुखे नरकात आम्ही तेथे तरी येवू नका अशा शब्दांत म्हस्के यांनी राष्ट्रवादीवर टीका केली.

ठाणे महापालिका नगरसेवकांचा पाच वर्षाचा कार्यकाल उद्या संपुष्टात येणार असून महापालिकेवर प्रशासक नेमला जाणार आहे. तत्पूर्वी झालेल्या शेवटच्या महासभेत महापौरांनी भाजपचे गोडवे गाताना काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना शालजोडीतले हाणले. म्हस्के यांनी काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय नगरसेवकांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी दांडी मारली होती तर भाजपच्या नगरसेवकांनी हजेरी लावली होती. हाच धागा पकडून म्हस्के म्हणाले की, राष्ट्रवादीच्या अनेक नगरसेवकांना माझ्या स्नेहभोजनाला यायचे होते; परंतु वरिष्ठांचा आदेश असल्यामुळे येऊ शकले नाहीत.

माझ्या स्नेहभोजनाला तुम्ही येऊ शकत नसाल तर, मी तुमच्यासोबत कशाला राहू? महाविकास आघाडीतील मित्र कार्यक्रमाला आले नसले तरी भाजपचे सर्व नगरसेवक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते. शिवसेना आणि भाजपची नैसर्गिक युती होती. भांडणे होऊन घरातून बाहेर पडलो तरी नाते तुटत नसते, असे विधानही त्यांनी केल्याने नव्या चर्चेला उधाण आले. ठाणे महापालिकेच्या सभागृहातही प्रस्थापित नगरसेवकांची मक्तेदारी होती. त्यांना वाटायचे आपल्याशिवाय इतर कोणी बोलू नये.

प्रस्थापित नगरसेवकांना लगावला टोला

महापौर झाल्यानंतर प्रस्थापितांना ठरवून धक्का दिला आणि नव्या नगरसेवकांना पुढे येण्याची संधी दिल्याचे सांगत म्हस्के यांनी त्यांचे राष्ट्रवादीमधील मित्र नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे, विक्रांत चव्हाण आदींसह इतर प्रस्थापित नगरसेवकांना टोला लगावला. कोरोना काळात सत्ताधारी पक्ष असल्यामुळे पक्षावर टीका होत होती; परंतु हाडाचा शिवसैनिक असल्यामुळे सर्वांना अंगावर घेतले तसेच स्वत:वर भ्रष्टाचाराचा एकही आरोप होऊ दिला नाही. हे सर्व करताना मैत्री जपण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, असे ते म्हणाले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका