मीरा भाईंदरमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी; शिवसेना, मनसेच्या वतीने ठिकठिकाणी शिवरायांना मानवंदना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2022 19:42 IST2022-03-21T19:41:22+5:302022-03-21T19:42:22+5:30
घोडबंदर किल्ल्याच्या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांनी व माजी उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी रोषणाई करून कार्यक्रम आयोजित केला होता.

मीरा भाईंदरमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी; शिवसेना, मनसेच्या वतीने ठिकठिकाणी शिवरायांना मानवंदना
मीरारोड - मीरा भाईंदरमध्ये आज सोमवारी तिथी प्रमाणे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. काशीमीरा नाका व महापालिका मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना पुष्प अर्पण करून विरोधी पक्षनेते धनेश पाटील, शिवसेना गटनेत्या नीलम ढवण, उपजिल्हाप्रमुख शंकर वीरकर आदींनी अभिवादन केले. शहरात शिवसेना, मनसे आदींच्या वतीने ठिकठिकाणी शिवरायांना मानवंदना देण्यात आली. घोडबंदर किल्ल्याच्या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थांनी व माजी उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी रोषणाई करून कार्यक्रम आयोजित केला होता.
हाटकेश भागात शाखा प्रमुख महेश शिंदे व शिवसैनिकांनी तर क्विन्स पार्क भागात शाहर प्रमुख लक्ष्मण जंगम आदींनी शिव जयंती निमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. मनसेच्या सचिन जांभळे, हरी पागेरा , कविता वायंगणकर आदींनी काशीमीरा भागात बाळ शिवरायांच्या मिरवणुकीचा देखावा सादर केला होता. मीरारोडमध्ये नगरसेवक राजू भोईर, शहरप्रमुख प्रशांत पालांडे आदींनी शिवजयंती साजरी केली .