Shiv Sainik vandalize own corporator's office in Badlapur | बदलापूरमध्ये शिवसैनिकांकडून नगरसेवकाच्या कार्यालयाची तोडफोड
बदलापूरमध्ये शिवसैनिकांकडून नगरसेवकाच्या कार्यालयाची तोडफोड

बदलापूर : शिवसेनेमधील अंतर्गत वाद उफाळला असून शिवसैनिकांनीच नगरसेवकाच्या कार्यालयाची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. 


बदलापूरातील शिवसेनेचे नगरसेवक शैलेश वडनेरे आणि शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यातील वाद आता पक्षाच्या चिंतेत वाढ करणारा ठरला आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेआधी वामन म्हात्रे आणि नगरसेवक शैलेश वडनेरे यांच्यात वादावादी झाली होती. त्या वादाचे पडसाद सभा संपल्यानंतर उमटले.


काही शिवसैनिकांनी वडनेरे यांच्या कार्यालयावर जाऊन त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे. या प्रकरणानंतर नगरसेवक आणि शहर प्रमुख यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला आहे. गेल्या वर्षभरापासून म्हात्रे आणि वडनेरे यांच्यात राजकीय वाद निर्माण झाला होता. त्यातच वडनेरे हे गेल्या सहा महिन्यांपासून विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराला लागले होते. त्यामुळे राजकीय दरी आणखीनच वाढली होती. या वादातूनच हा हल्ला झाला आहे. 


या प्रकारानंतर शैलेश वडनेरे यांनी शिवसैनिकांच्या विरोधात बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Shiv Sainik vandalize own corporator's office in Badlapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.