विद्यार्थ्यांना कोंबडा बनवून काढला सेल्फी, डोंबिवलीतील लोढा हेवन परिसरातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 20:11 IST2017-09-28T20:11:00+5:302017-09-28T20:11:16+5:30
डोंबिवली येथील पुर्वेकडील शिळफाटा रोडवरील लोढा हेवन लगत असलेल्या एका मॉलच्या आवारात फिरण्यासाठी आलेल्या विद्याथ्र्याना या भागातील काही तरूणांनी अश्लील चाळे केल्याच्या आरोप करीत मारहाण केली.

विद्यार्थ्यांना कोंबडा बनवून काढला सेल्फी, डोंबिवलीतील लोढा हेवन परिसरातील धक्कादायक घटना
डोंबिवली - येथील पुर्वेकडील शिळफाटा रोडवरील लोढा हेवन लगत असलेल्या एका मॉलच्या आवारात फिरण्यासाठी आलेल्या विद्याथ्र्याना या भागातील काही तरूणांनी अश्लील चाळे केल्याच्या आरोप करीत मारहाण केली. यावेळी त्यांनी संबंधित विद्यार्थ्यांना कोंबडा बनायला भाग पाडून त्यांचा सेल्फी काढला. या संपूर्ण प्रकाराची छायाचित्रे आणि व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली असून मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी मारहाण करणा-या तरूणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मुंब्रा, डोंबिवली आणी आजूबाजूच्या परिसरात राहणारे काही विद्यार्थी आणी विद्यार्थिनी बुधवारी सायंकाळी डोंबिवली पूर्वेकडील लोढा परिसरात असलेल्या एका मॉल मध्ये फिरण्यास आले होते .यावेळी अचानक या परिसरात राहणा-या काही तरुणांची नजर त्यांच्यावर पडली त्यांनी या विद्याथ्र्याना इथे का येतात असा जाब विचारत शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरु वात केली. हे तरुण इथेच थांबले नाही तर त्यांनी या विद्याथ्र्याना ओणवे उभे करीत कोंबडा बनण्यास भाग पाडत त्याचा सेल्फी काढला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ काढीत हे फोटो सोशल मिडीयावर अपलोड केले. विशेष म्हणजे हे सगळे घडत असताना बघ्यांच्या गर्दीतून एकानेही हे कृत्य करणा-यांना विरोध करण्याचे धाडस दाखविले नाही. दरम्यान मानपाडा पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत मारहाण करणा-यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विद्यार्थी अश्लील चाळे करत असल्याचा आरोप होत असला तरी या तरु णांना शिक्षा देण्याचा अधिकार कुणी दिला? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.