३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कसाऱ्यासह शहापूर पोलीस अलर्ट; ठिकठिकाणी नाकाबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 19:21 IST2024-12-31T19:19:48+5:302024-12-31T19:21:50+5:30

पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.

Shahapur police on alert along with Kasaragod in the backdrop of December 31 blockades in various places | ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कसाऱ्यासह शहापूर पोलीस अलर्ट; ठिकठिकाणी नाकाबंदी

३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कसाऱ्यासह शहापूर पोलीस अलर्ट; ठिकठिकाणी नाकाबंदी

शाम धुमाळ, लोकमत न्यूज नेटवर्क, कसारा:  ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर शहापूर तालुक्यातील हिल स्टेशन असलेल्या व सर्वाधिक रिसॉर्ट ,बार असलेल्या शहापूर,वासिद, कसारा,किन्हवली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गाव ,पाड्यात व शहरात कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी तसेच टवाळखोर, हुल्लडबाजी करणाऱ्यांना आवर घालण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक ड्रॉ.डी. एस. स्वात्मी ,अप्पर पोलीस अधीक्षक भरत तांगडे,.शहापूर उपविभागीय पोलीस उपाधीक्षक मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कसारा, शहापूर, किन्हवली, वासिंद पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.

यंदा ३१ डिसेंबर आणि नववर्षाचे स्वागत यानिमित्त हाॅटेल आणि बियर बार यांना रात्री उशिरापर्यंत खुले ठेवण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे पोलिसांचे काम मात्र वाढणार आहे. मद्यपी, गटागटाने ओरडत फिरणारे टवाळखोर तसेच हुल्लडबाज यांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागू नये म्हणून पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. मंगळवारी सायंकाळी पाचपासून रात्री उशीरापर्यंत प्रमुख चौकांसह महत्वाच्या ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली असून वाहन चालकांची अल्कोमीटरद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. मद्यपान करुन वाहन चालविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. सुमारे  शेकडो पोलीस रस्त्यावर तैनात करण्यात आले आहेत.

उपविभागीय पोलीस उपाधीक्षक मिलिंद शिंदे,यांच्या मार्गदर्शनाखाली  कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुनील गावित,शहापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी ठाकूर,किन्हवली पोलीस ठाण्याचे प्रभारी खैरनार वासिंद पोलीस ठाण्याचे प्रभारी बारवे हे धोकादायक ठिकाणी भेटी देत आहेत.
 
शहापूर तालुक्यात अनेक पार्टी स्पॉट असून हौशी लोकांनी जंगलात देखील पार्टी ची अरेंजमेंट केल्या आहेत.शहरी भागा पेक्षा ग्रामीण गाव पाड्यात बाहेरून येणाऱ्या लोकांच्या पार्ट्या वर लक्ष ठेवण्या बाबत पोलिसां समोर एक आवाहन् असणार असून पोलिसांनी जगंलात असलेल्या रिसॉर्ट,बंगले चालकांना कायदा सुव्यवस्थे बाबत समज् दिली आहे..
 

Web Title: Shahapur police on alert along with Kasaragod in the backdrop of December 31 blockades in various places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.