गर्डर मशीन कोसळून झालेली ही दुर्घटना अतिशय वेदनादायक: रवींद्र चव्हाण

By सुरेश लोखंडे | Updated: August 1, 2023 11:28 IST2023-08-01T11:27:49+5:302023-08-01T11:28:22+5:30

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मजुरांना भावपूर्ण श्रद्धांजली!

shahapur machine collapse accident is very painful said ravindra chavan | गर्डर मशीन कोसळून झालेली ही दुर्घटना अतिशय वेदनादायक: रवींद्र चव्हाण

गर्डर मशीन कोसळून झालेली ही दुर्घटना अतिशय वेदनादायक: रवींद्र चव्हाण

ठाणे : शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे समृद्धी महामार्गाचे काम सुरू असताना गर्डर मशीन कोसळून घडलेली दुर्घटना अतिशय दुःखदायी आणि वेदनादायक आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मजुरांना भावपूर्ण श्रद्धांजली !

ही दुःखद घटना घडलेल्या घटनास्थळाची पाहणी केली. या दुर्घटनेची तज्ञांमार्फत सखोल चौकशी करण्यात येणार असून मृतांना न्याय मिळवून देण्यात येईल.  या दुर्घटनेत जखमी झालेल्या  मजुरांवर शासकीय खर्चातून उपचार करण्यात येत असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना! सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडून शहापूर घटनास्थळाची पाहणी करताना अशी हळहळ व्यक्त केली.

Web Title: shahapur machine collapse accident is very painful said ravindra chavan