लग्नाचे अमिष दाखवून लैंगिक अत्याचार: साडे चार लाख रुपये उकळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 21:44 IST2018-07-19T21:36:42+5:302018-07-19T21:44:08+5:30
लग्नाचे अमिष दाखवून एका विवाहितेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याने तिच्याकडून धमकावनून चार लाख ८७ हजारांची रोकड उकळयाचा प्रकार ठाण्याच्या कोपरीमध्ये घडला.

लैंगिक अत्यारानंतर पैशांसाठीही धमकावले
ठाणे: व्हॉटसअॅप आणि फेसबुकच्या माध्यमातून कोपरीतील एका विवाहितेला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करुन तिच्याकडून चार लाख ८७ हजारांची रक्कम उकळणा-या अनिराज पांडे याच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पांडे याने या विवाहितेशी ३ मार्च २०१८ पासून फेसबुक आणि व्हॉटसअॅपच्या माध्यमातून चॅटिंग करुन जवळीक साधली. त्यानंतर तिला लग्नाचे अमिष दाखवून २ मे २०१८ रोजी तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. तिच्याशी संबंध प्रस्थापित झाल्यानंतर वारंवार धमकावून तिच्याकडून पैशांची मागणी करीत तिच्याकडून चार लाख ८७ हजारांची रक्कमही घेतली. आपली आर्थिक आणि शारिरीक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने अखेर याप्रकरणी १९ जुलै रोजी कोपरी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक एस. एस. जगताप याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.