शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

शिवडी-न्हावा-शेवा सी लिंक प्रकल्प : बाधित खारफुटीच्या बदल्यात वनीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 05:03 IST

मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू अर्थात सी-लिंकच्या मार्गात ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील ४७.४१७ हेक्टर खारफुटी आणि संरक्षित वनांची जमीन जाणार आहे.

- नारायण जाधवठाणे : मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू अर्थात सी-लिंकच्या मार्गात ठाणे आणि रायगड जिल्ह्यांतील ४७.४१७ हेक्टर खारफुटी आणि संरक्षित वनांची जमीन जाणार आहे. या बदल्यात एमएमआरडीएने वनविभागाला रायगड जिल्ह्यातील पनवेल, श्रीवर्धन तालुक्यांतील तितक्याच क्षेत्राच्या वनेतर जमिनीसह पर्यायी वनांची लागवड, कांदळवन लागवडीसह समुद्री जिवांच्या संवर्धनाकरिता मोठा निधी कांदळवन कक्षाकडे हस्तांतरित केला आहे. शिवाय, पर्यायी २०० हेक्टर कांदळवन लागवडीची हमी घेतली आहे. याच अटीवर सी-लिंकच्या मार्गात बाधित होणारे संरक्षित वन आणि खारफुटी तोडण्यास ठाणे येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयाने एमएमआरडीएला परवानगी दिली आहे.मुंबई व नवी मुंबईला जोडणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून शिवडी-न्हावा शेवा सी-लिंक सेतूकडे पाहिले जाते. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे भूमिपूजन झाल्यानंतर हा २२.५ किमीचा सेतू होणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे दक्षिण मुंबई व नवी मुंबई विमानतळ हे अंंतर अवघ्या अर्ध्या तासात कापता येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या सेतूचे काम रखडले होते. मात्र, आता सर्व परवानग्या मिळाल्या असून त्यात बाधित होणाºया ४७.४१७ हेक्टर संरक्षित वनजमीन आणि खारफुटीच्या बदल्यात एमएमआरडीएने वनविभागाला तितक्याच वनेतर जमिनीसह नव्याने २०० हेक्टर कांदळवन लागवडीची हमी घेतली आहे. जी वनेतर जमीन उपलब्ध करून दिली आहे, त्यावर वनलागवडीचा खर्चही वनविभागाला दिला आहे. जे ४७.४१७ हेक्टर संरक्षित वनक्षेत्र जाणार आहे.वनीकरणाकरिता खर्चही दिलापर्यायी वनाकरिता एमएमआरडीएने मोठा निधीही संबंधित यंत्रणांकडे सुपुर्द केला आहे. यात वनीकरणाकरिता २ कोटी १४ लाख ३ हजार ३२३, नक्तमूल्य म्हणून ४ कोटी ४५ लाख २४ हजार ५६३, पक्षी अधिवासाकरिता कृत्रिम घरटी बांधणे आणि मृदजलसंधारणाच्या कामाकरिता ६२ लाख ५० हजार, तसेच पर्यायी २०० हेक्टर कांदळवन लागवडीकरिता ५ कोटी ५ लाख ८८ हजार ६०० रुपये निधी कांदळवन कक्षाकडे हस्तांतरित केला आहे.याशिवाय, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने सुचवलेल्या शिफारशी आणि राज्य वन्य जीव मंडळाने केलेल्या सुधारणा एमएमआरडीएने स्वखर्चाने करणे आवश्यक आहे. त्यानुसार, मुख्य वनसंरक्षक कांदळवन कक्ष, यांनी समुद्री जिवांच्या संवर्धनासाठी प्रस्तावित केलेले ८६ कोटी ३१ लाख रुपयेसुद्धा प्रकल्प यंत्रणा अर्थात एमएमआरडीएने कांदळवन कक्षाकडे हस्तांतरित केले आहेत.या अटींवर दिली आहे परवानगीखारफुटी तोडण्याची व सी-लिंकची कामे परवानगी वनक्षेत्रात कामे करण्यापुरती आहे. प्रकल्प यंत्रणेने कामे सुरू करण्यापूर्वी वनसंरक्षकांना कळविणे आवश्यक आहे. तसेच झाडे तोडण्यासाठी वनक्षेत्रपालांची परवानगी घेणे क्रमप्राप्त आहे. जे कांदळवन वृक्ष काढावे लागणार आहेत, त्यांना कमीतकमी हानी पोहोचवावी.

टॅग्स :forestजंगलnewsबातम्या