कल्याण : भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात कल्याणजवळ मोहने गाळेगाव परिसरात जखमी झालेल्या एका सात वर्षाच्या आदिवासी मुलाचा बुधवारी मृत्यू झाला. अन्य एका जखमी मुलावर उपचार सुरू आहेत.
खुशील शंकर वाघे या कातकरी पाड्यावरील मुलावर कुत्र्याने हल्ला केला होता. यात खुशीलच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या. उपचार सुरू असताना त्याचा त्याच दिवशी रात्री मृत्यू झाला. त्याच्या सोबतच्या एका मुलाला एकाच वेळी कुत्रा चावला होता.
दोन वर्षांपूर्वी टिटवाळा येथे महिलेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. तिला फरफटत नेले होते. मुंबईतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर, कल्याणच्या चिमुकल्याच्या गुप्तांगाला कुत्र्याने चावा घेतला होता.
श्वानांचे निर्बीजीकरण केले; पण...
भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचे काम महापालिकेने खासगी कंत्राटदार कंपनीला दिले आहे. कंपनीकडून २०२४ आणि २०२५ या दोन वर्षात २०,१९३ श्वानांचे निर्बीजीकरण करण्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
मात्र, कंत्राटदार कंपनीकडून योग्य प्रकारे काम केले नसल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते मनोज कुलकर्णी यांनी केली होती. पालिकेने त्यानंतर त्याचे कंत्राट रद्द केले.
Web Summary : A seven-year-old boy died in Kalyan after a stray dog attack. Another child is receiving treatment. The municipality had previously contracted dog sterilization, but the contract was cancelled due to improper work. Similar incidents have occurred in the past, raising concerns about stray dog control.
Web Summary : कल्याण में आवारा कुत्ते के हमले में सात वर्षीय बच्चे की मौत हो गई। एक अन्य बच्चे का इलाज चल रहा है। नगर पालिका ने पहले कुत्ते की नसबंदी का अनुबंध किया था, लेकिन अनुचित काम के कारण अनुबंध रद्द कर दिया गया। अतीत में भी ऐसी घटनाएं हुई हैं, जिससे आवारा कुत्ते के नियंत्रण को लेकर चिंता बढ़ गई है।