भिवंडीत सात लाखाचे अमली पदार्थ जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:50 IST2021-06-09T04:50:03+5:302021-06-09T04:50:03+5:30
भिवंडी : शांतिनगर परिसरात नशेकरिता वापरल्या जाणाऱ्या कफ सिरपचा साठा घेऊन एक जण येणार असल्याची माहिती शांतिनगर पोलीस ठाण्याचे ...

भिवंडीत सात लाखाचे अमली पदार्थ जप्त
भिवंडी : शांतिनगर परिसरात नशेकरिता वापरल्या जाणाऱ्या कफ सिरपचा साठा घेऊन एक जण येणार असल्याची माहिती शांतिनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांना मिळाल्याने त्यांनी खंडूपाडा येथे सापळा रचून दुचाकीवर आलेल्या संशयित व्यक्तीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याजवळ तब्बल ९६० फेन्सिरॅक्स या कफ सिरपच्या बाटल्या व एसेन-१ ‘बटण गोळी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गोळ्यांचे पाकीट आढळून आले. त्याच सोबतच भादवड पोगाव पाईपलाईन रस्त्यावर मॅफड्रीन क्रिस्टल पावडर घेऊन येणाऱ्या संशयिताला पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडून मॅफड्रीन हा मादक पदार्थ जप्त करण्यात आला. दोन्ही कारवाईत एकूण ७ लाख २० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात शांतिनगर पोलिसांना यश आले आहे .
असरफ इजाज अहमद अन्सारी ( वय २३ वर्षे) व मोहम्मद अली इर्शाद अली कुरेशी (वय ४७ वर्षे ) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून या आरोपींची सखोल चौकशी सुरू केली आहे. पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत, पो. निरीक्षक किरणकुमार काबाडी, पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
........
वाचली