शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

पोलिसांनी वेषांतर करून शोधले सोनसाखळी चोर, दहा दिवस ठेवली पाळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 2:03 AM

शहरातील विविध पोलीसठाण्याअंतर्गत दाखल सोनसाखळी चो-यांचा छडा लावून ठाणे पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने तब्बल १७ सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून सात जणांना अटक केली आहे.

ठाणे : शहरातील विविध पोलीसठाण्याअंतर्गत दाखल सोनसाखळी चो-यांचा छडा लावून ठाणे पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाने तब्बल १७ सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून सात जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ४०७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकूण ८ लाख २७ हजारांचा किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक केलेल्या आरोपींना २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.कळवा, राबोडी, नौपाडा, शिळ डायघर या ठिकाणी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व चेन चोरणा-या चार आरोपींना उपायुक्त डॉ. डी .एस . स्वामी व त्यांच्या सहका-यांनी पकडले. मिळालेल्या माहितीनुसार ठाणे शहराच्या हद्दीत चेन स्नेचिंग करणारे मोक्काचे आरोपी हे अजमेर, राजस्थान येथे वास्तव्यास असल्याचे समजले.त्यानुसार त्यांना पकडण्यासाठी दरोड विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अशोक भंडारे ,पोलीस नाईक सुरेश चव्हाण यांनी अजमेर येथे जाऊन वेषांतर करून त्यांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरु वात केली. दहा दिवस सतत मागोवा घेतल्या नंतर तेथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी सरफराज फिरोज बेग उर्फसय्यद व त्याच्या चार साथीदारांना पकडण्यात त्यांना यश आले. त्यांना ताब्यात घेऊन ते ठाण्यात आणल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी कळवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ६, राबोडी १, नौपाडा १ असे एकूण ८ चेन स्नेचिंगचे गुन्हे केल्याचे कबुल केले. त्यांच्याकडून ४,३५,००० रु पयाचे २३९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.तसेच कळवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बागडे यांनी आपल्या हद्दीतील पोलीस गस्त मोठ्या प्रमाणात वाढवली होती. अशीच गस्त घालत असतांना दुचाकीवरुन येऊन मंगळसूत्र खेचून पळणारा एक आरोपी रिझवान ईस्माईल शेख हा रंगेहाथ सापडल. या आरोपीने निजामपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक दुचाकी चोरली होती. त्या वरून तो व त्याचा साथीदार अली उर्फमामू साहिद हे कळवा येथील एका महिलेचे मंगळसूत्र खेचून पळत असताना पोलीस नाईक कोटकर व ढेबे यांनी पाठलाग करून त्यांना रंगेहाथ पकडले.त्याच्याकडे कसून चौकशीकेली असता त्याने कळवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत ४ ,नौपाडा ४ व शीळ डायघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत १ असे नऊ गुन्हे केल्याचे कबुल केले. त्यांच्याकडून ३,९३,००० रु पये किंमतीचे १६८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले.अटक आरोपींना २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीअशा प्रकारे पोलिसांनी सगळ्या आरोपींकडून एकूण १७ गुन्हे उघडकीस आणून ८,२७,००० रूपयाचा माल हस्तगत केला. यातील तीन आरोपींवर यापूर्वी मोक्काअंतर्गत कारवाई केलेली आहे. तसेच हे चोर चोरीसाठी वाहनांचा वापर करीत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. अटक आरोपींनी २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

टॅग्स :Crimeगुन्हा