शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फीने खच्चून भरलं फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 06:30 IST

सेल्फी विथ व्होटचे फोटो शेअर करण्याबाबत तरुणाईइतकाच उत्साह पाहायला मिळाला, तो ज्येष्ठांचा. आम्ही मतदान केले, तुमचे काय, अशी जबाबदारीची जाणीव करून देणाऱ्या प्रश्नासह अनेकांनी आपले सोशल मिडीयामध्ये शेअर केले.

स्नेहा पावसकर ठाणे : अगदी लहानसहान गोष्ट व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर पोस्ट करणाऱ्या तरुणाईने सोमवारी मतदान केल्यावर आपले फोटो शेअर केले नसते, तर नवल वाटले असते. पण, सेल्फी विथ व्होटचे फोटो शेअर करण्याबाबत तरुणाईइतकाच उत्साह पाहायला मिळाला, तो ज्येष्ठांचा. आम्ही मतदान केले, तुमचे काय, अशी जबाबदारीची जाणीव करून देणाऱ्या प्रश्नासह अनेकांनी आपले फोटो फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर सकाळपासून शेअर करायला सुरुवात केली आणि सोशल मीडिया दिवसभरात व्होटरमय होऊन गेला. 

लोकशाहीचं सगळ्यात मोठं कर्तव्य अर्थात मतदान. जास्तीतजास्त लोकांनी मतदान करावे आणि त्यातही देशाचे भविष्य असलेल्या तरुणाईने जबाबदारीने मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी जागृती केली गेली. सोमवारी झालेल्या मतदानात तरुणाईचा उत्साह पाहायला मिळाला. मतदान केल्यावर अनेकांनी सकाळपासूनचा आपला मतदानाची खूण असलेल्या बोटासोबतचा सेल्फी व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर शेअर करून आपण हक्क बजावल्याचे दाखवले. यात मध्यमवयीन आणि ज्येष्ठही मागे नव्हते. अनेकांनी मतदान केल्यानंतर आपले स्वत:चे तसेच सहकुटुंबाचे फोटो पोस्ट केले आणि इतरांनाही मतदानाचे आवाहन केले. ठाण्यातील रवी जाधव, विजू माने, सुनील गोडसे, अशोक नारकर, नयन जाधव आदी कलावंतांनीही आपले सेल्फी विथ व्होटचे फोटो फेसबुकवर शेअर करून लोकशाहीचा उत्सव..., आम्ही केलं तुम्हीही करा..., ठाणेकर व्होट कर... अशा प्रकारच्या कॅप्शनसह सामान्य नागरिकांना मतदानासाठी आवाहन केलेले दिसले. अनेक नवमतदारांनीही फर्स्ट व्होट... म्हणत आपले फोटो पोस्ट केले होते. त्यामुळे सोमवारी सोशल मीडियावरही लोकशाहीच्या उत्सवाचाच फिव्हर व चर्चा होती.

टॅग्स :ElectionनिवडणूकSocial Mediaसोशल मीडियाWhatsAppव्हॉटसअ‍ॅपFacebookफेसबुक