महापालिका सुरक्षारक्षकांना सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण; शंभर जणांनी गिरवले धडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 19:46 IST2021-09-04T19:45:18+5:302021-09-04T19:46:09+5:30

शंभर सुरक्षारक्षकांनी यासंदर्भात धडे गिरविण्यास सुरुवात केली आहे.

self defense training for municipal security guards | महापालिका सुरक्षारक्षकांना सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण; शंभर जणांनी गिरवले धडे

महापालिका सुरक्षारक्षकांना सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण; शंभर जणांनी गिरवले धडे

लोकमत न्यूज नेटवर्क 

ठाणे : ठाणे महापालिका माजीवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ठाणे महापालिकेने एक पाऊल पुढे टाकत, आता, भविष्यात असे चाकू हल्ले रोखण्यासाठी महापालिकेच्या तसेच बोर्डाच्या सर्व सुरक्षारक्षकांना आत्मरक्षण, चाकु हल्ला संरक्षण सेल्फ डिफेन्स, क्नैफ डिफेन्सचे धडे देण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी सकाळी दोन तास शंभर सुरक्षारक्षकांनी यासंदर्भात धडे गिरविण्यास सुरुवात केली आहे.

ठाणे महापालिकेची सुरक्षा अजुन बळकट करण्याकरिता महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या सूचनेनुसार शनिपासून या प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली आहे. एखाद्या वेळी अधिकाऱ्यांवर अचानक होणारे हल्ले होतात. ते कसे रोखावे, त्याचबरोबर कश्या प्रकारे स्वतःचे व अधिकाऱ्याचे रक्षण करावे या करीता मार्शल आर्ट, ज्युडो यांचे प्रशिक्षण व प्रात्येक्षिक करून घेण्यात आले . मुंब्र्यातील दि. लेजंट ऑफ मार्शल आर्ट, या संस्थेने पुढाकार घेतला आहे. ५४ अंगरक्षक तसेच ४५ महाराष्ट्र सुरक्षा बलच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी ठाणे पालिकेच्या सुरक्षा विभाग तर्फे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात मुख्य सुरक्षा अधिकारी मच्छिंद्र थोरवे यांनी देखील सहभाग घेतला होता.
 

Web Title: self defense training for municipal security guards