शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

आरटीईच्या प्रवेशासाठी ९,३२६ बालकांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 11:16 PM

प्रवेशाअभावी चिंता; प्रक्रिया पूर्ण करण्याची पालकांची मागणी

- सुरेश लोखंडे ठाणे : शिक्षणाचा हक्क (आरटीई) कायद्याखाली जिल्ह्यातील नऊ हजार ३२६ बालकांची पहिली ते केजीच्या वर्गासाठी निवड झाली. लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या या बालकांना जिल्ह्यातील ६६९ शाळांमध्ये प्रवेश घेता येणार आहे. मात्र, संबंधित शाळेत प्रवेशासाठी गेलेल्या या पालकांना सुटीचा बहाणा करून कार्यालयांमध्ये उभेही करीत नसत. पण आता शाळा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या बालकांचे रखडलेले प्रवेश करण्याची मागणी पालकांमधून होत आहे.उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या खासगी, अनुदानित व विनाअनुदानित ६६९ शाळांमध्ये आरटीई अंतर्गत यंदाच्या शैक्षणिक वर्षात १२ हजार ९१३ बालकांचे शालेय प्रवेश आरक्षित ठेवले आहेत. त्यासाठी २0 हजार ६६७ अर्ज आले असता त्यातून या नऊ हजार ३२६ विद्यार्थ्यांची पहिल्या लॉटरीद्वारे निवड झाली आहे. मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, दिव्यांग आदी सर्व प्रवर्गातील निवड झालेल्या या बालकांचे प्रवेश कोरोनाचे संकट आणि शाळांच्या सुटीमुळे रखडले आहेत. परंतु, आता शाळांचे कार्यालयीन कामकाज सुरू असल्यामुळे या बालकांचे प्रवेश सोशल डिस्टन्सद्वारे करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.या शैक्षणिक वर्षात पहिलीच्या वर्गात ११ हजार ५७४ बालकांना तर केजीच्या वर्गात एक हजार ३३९ बालकांचे प्रवेश आरटीईखाली निवड झालेल्या संबंधित शाळांमध्ये राखीव आहेत. या १२ हजार ९१३ राखीव जागांवरील प्रवेशासाठी नऊ हजार ३२६ बालकांची निवड झाली आहे. उर्वरित प्रवेश अर्जातील त्रुटी, अपूर्ण अर्ज, कागदपत्रांची कमतरता आदी कारणांखाली बहुतांश अर्ज बाद ठरले आहेत. मात्र, पात्र ठरलेले व निवड झाल्याचा मेसेज प्राप्त झालेल्या बालकांचे पालक संबंधित शाळांमध्ये सतत फेºया मारत आहेत. त्यांना योग्य मार्गदर्शन होत नसल्यामुळे ते द्विधा मन:स्थितीत असल्याने त्यांची चिंता वाढलेली आहे.नवी मुंबईत सर्वाधिक प्रवेश रखडलेआरटीईच्या प्रवेशासाठी नवी मुंबईच्या सर्वाधिक दोन हजार ४५ बालकांची निवड झाली असून ते प्रवेश रखडले आहेत. याखालोखाल ठाणे मनपा २ च्या एक हजार ४७५ तर केडीएमसीच्या एक हजार २0४ बालकांची निवड झाल्याचे व कोणत्या शाळेत प्रवेश घ्यायचा ते नावही पालकांना मेसेजद्वारे कळविण्यात आले आहे. पण कार्यालये सुरू असतानाही या बालकांचे प्रवेश कोरोनाच्या भीतीमुळे रखडल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. यामध्ये अंबरनाथच्या ९८५ बालकांसह कल्याण ग्रामीणचे ९४७, ठाणे १ च्या ८७४ बालकांचा समावेश आहे. याप्रमाणेच भिवंडी १ च्या ७३४, भिवंडी २ चे ३४१, मीरा-भार्इंदरचे १६४, मुरबाडचे ५५, शहापूरचे ३४७ आणि उल्हासनगरच्या १५५ बालकांचे शालेय प्रवेश अद्याप रखडले आहेत.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदा