Thane: हिरानंदानी मेडोज येथील स्वच्छतागृहात सुरक्षा रक्षकाचा ह्रदयविकाराने मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 21:56 IST2023-01-17T21:55:39+5:302023-01-17T21:56:16+5:30
Thane: हिरानंदानी मेडोजच्या बाजूला असलेल्या एका स्वच्छतागृहात मनोहर अंबाडकर (७१) या सुरक्षा रक्षकाचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. चितळसर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.

Thane: हिरानंदानी मेडोज येथील स्वच्छतागृहात सुरक्षा रक्षकाचा ह्रदयविकाराने मृत्यू
- जितेंद्र कालेकर
ठाणे : हिरानंदानी मेडोजच्या बाजूला असलेल्या एका स्वच्छतागृहात मनोहर अंबाडकर (७१) या सुरक्षा रक्षकाचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. चितळसर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.
हिरानंदानी मेडोजच्या बाजूला असलेल्या अमडा शॉपिंग सेंटर जवळील एका सार्वजनिक स्वच्छतागृहामध्ये मनोहर हे प्रात:र्विधीसाठी गेले होते. बराच वेळ होऊनही स्वच्छतागृहाचा दरवाजाच उघडला न गेल्याने स्थानिकांना संशय आला. दरवाजा जोर लावून उघडण्यात आला तेंव्हा मनोहर हे बेशुद्धावस्थेत पडल्याचे आढळले. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ह्रदयविकारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन करणाºया डॉक्टरांनी स्पष्ट केले. बुधवारी अमरावती येथून त्यांचा मुलगा आल्यानंतर त्याच्या ताब्यात मृतदेह दिला जाणार असल्याची माहिती चितळसर पोलिसांनी दिली.