मृतदेहाचा शोध तीन दिवसानंतरही सुरूच
By Admin | Updated: August 18, 2015 01:39 IST2015-08-18T01:39:17+5:302015-08-18T01:39:17+5:30
मुरूड तालुक्यातील काशिद समुद्र किनारी १५ आॅगस्ट या दिनी अहमदनगर कोपरगाव येथील अक्षय बाळासाहेब खुराडे (२२) व राहुल नामदेव चिले (१८) हे दोघेही खोल समुद्रात वाहून गेले होते

मृतदेहाचा शोध तीन दिवसानंतरही सुरूच
मुरूड : मुरूड तालुक्यातील काशिद समुद्र किनारी १५ आॅगस्ट या दिनी अहमदनगर कोपरगाव येथील अक्षय बाळासाहेब खुराडे (२२) व राहुल नामदेव चिले (१८) हे दोघेही खोल समुद्रात वाहून गेले होते. त्यापैकी अक्षय खुराडे याचा मृतदेह काशिद समुद्रकिनाऱ्याच्या दक्षिण भागात आढळला, परंतु आज तीन
दिवस संपत आले तरी राहुल चिले याचा थांगपत्ता लागत नसल्याने त्याचे नातेवाईक हैराण झाले आहेत. मुरूड पोलीस सर्व सागरकिनारे तपासत असून, त्याचा शोध घेत आहेत. परंतु
राहुलचा तपास लागत नसल्याने मुरूड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुकाराम पवळे यांनी ज्येष्ठांकडे
विनंती करून हेलिकॉप्टर पाहणी करावयास लावली. नेव्हीच्या हेलिकॉप्टरने पहाणी करून सुध्दा अद्याप राहुल चिले याचा थांगपत्ता लागत नाही. शोधकार्य जोरदार सुरू असूनसुद्धा यश येत नाही.