शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्यांसाठी ४५ लाख रिकाम्या गोण्यांची शोधाशोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 02:02 IST

ठाणे जिल्ह्यात यंदा सर्वाधिक १६५ मिमी पाऊस पडला असून डोंगरउतारांवरून पावसाचे पाणी वाहून जात आहे.

- सुरेश लोखंडेठाणे : जिल्ह्यात यंदा सर्वाधिक १६५ मिमी पाऊस पडला असून डोंगरउतारांवरून पावसाचे पाणी वाहून जात आहे. या वाहत्या पाण्यास वेळीच अडवून पाणीटंचाई दूर करण्यासह रब्बी पिकांसाठी त्याचा वापर करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेने लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी सिमेंटच्या रिकाम्या ४५ लाख गोण्या मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेकडून (जि.प.) शोधाशोध सुरू झाली आहे.मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आदी महानगरांना पाणीपुरवठा करणाºया ठाणे जिल्ह्यात सर्वच तालुक्यांतील ग्रामीण जनता तीव्र पाणीटंचाईला तोंड देते. या समस्येवर काही प्रमाणात मात करण्यासाठी सध्या वाहत असलेल्या छोट्यामोठ्या नद्या, नाले, ओढे आदींचे पाणी वेळीच अडवण्यासाठी वनराई बंधारे बांधण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. यासाठी नदी, नाले, ओढ्यांवर बांधण्यात येणाºया वनराई बंधाऱ्यांचे ठिकाण शोधण्यासाठी यंत्रणा जिल्ह्यात सतर्क झाली आहे. याशिवाय, त्यासाठी लागणाºया गोण्या मिळवण्यासाठी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, बिल्डर्स असोसिएशन, कंत्राटदार, जिल्ह्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या गृहप्रकल्पांच्या यंत्रणा, नगरपालिका, नगर परिषदा, कंपन्या आदींशी संपर्क साधून सिमेंटच्या रिकाम्या गोण्या देण्याचे लेखी आवाहन केल्याचे ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी लोकमतला सांगितले.साडेचार हजार वनराई बंधा-यांचे नियोजनया ४५ लाख रिकाम्या गोण्यांमध्ये माती भरून त्या वाहत्या पाण्यात एकावर एक ठेवून लांब बंधारा बांधला जाणार आहे. जिल्हाभरात स्थानिक गावकºयांच्या लोकसहभागातून तब्बल चार हजार ५०० वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत. यामध्ये शहापूर, मुरबाड या दोन्ही तालुक्यांत प्रत्येकी एक हजार ५०० बंधारे बांधण्याचे नियोजन केले. भिवंडीला एक हजार आणि कल्याण, अंबरनाथ तालुक्यांत प्रत्येकी २५० वनराई बंधारे बांधण्यासाठी लागणाºया ठिकाणांचा शोध पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांच्या माध्यमातून घेतला जात आहे. निवडणूक संपताच हा उपक्रम युद्धपातळीवर राबवण्याची जय्यत तयारी सुरू झाली आहे.भूगर्भातील पाणीसाठा टिकवणारया वनराई बंधाºयांमुळे उन्हाळ्यात उद्भवणाºया पाणीटंचाईला काहीअंशी आळा घालणे शक्य होणार आहे. याशिवाय, दैनंदिन वापरासह गुरंढोरं, वन्य पशुपक्षी आदींना या वनराई बंधाºयातील पाणी नवसंजीवनी देणार आहे. शेतकºयांना भेंडीसारख्या नगदी रब्बी पिकांप्रमाणेच पालेभाज्यांचे उत्पन्न सहज घेता येईल. याकरिता या बंधाºयांतील पाण्याचा वापर उपयुक्त ठरणार आहे. विहिरींमधील पाण्याची पातळी वाढण्यासह भूगर्भातील पाणीसाठा टिकवून ठेवता येणार आहे.विद्यार्थ्यांचा सहभाग घेणारया नवसंजीवनी देणा-या उपक्रमासाठी स्थानिक गावकºयांच्या लोकसहभागाप्रमाणेच ठाणे, मुंबईतील महाविद्यालयातील विद्यार्थी, एनएसएस, एनसीसी आदी विद्यार्थी संघटना, उद्योगधंदे, कारखाने, शाळा, महाविद्यालये, सामाजिक, राजकीय संघटना, शिक्षक संघटना आदींचा सहभाग घेऊन वनराई बंधाºयांची निर्मिती करण्याचे नियोजन ठाणे जिल्हा परिषदेने केले आहे.

टॅग्स :thaneठाणे