शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

लोकल टू ग्लोबल शिक्षण देणारी शाळा; खर्डीतील आंतरराष्ट्रीय शाळेत विद्यार्थी घेताहेत डिजिटल शिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2020 02:04 IST

शासनाने राज्यातील १३ शाळांची आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून निवड केली त्यापैकी ठाणे जिल्ह्यातील ही एकमेव शाळा होय.

- स्नेहा पावसकर

ठाणे : केवळ पुस्तकी नाही तर प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण, दप्तराचे ओझे न बाळगता डिजिटलाइज शिक्षण, लोकल टू ग्लोबल शिक्षण, अभ्यासक्रमआधारितच नव्हे तर व्यावहारिक शिक्षण मुलांना दिले जात आहे ते ठाणे जिल्ह्यातील खर्डी येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेत. मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने उपक्रम राबविणारी ही शाळा प्रयोगशील शाळा ठरत आहे.शासनाने राज्यातील १३ शाळांची आंतरराष्ट्रीय शाळा म्हणून निवड केली त्यापैकी ठाणे जिल्ह्यातील ही एकमेव शाळा होय. शाळेचे हे दुसरे वर्ष असून सध्या शाळेत ज्युनिअर केजी ते ४ थी इयत्तेपर्यंतचे वर्ग चालतात. प्रत्येक इयत्तेत ६० विद्यार्थी आहेत. या शाळांसाठी अभ्यासक्रम वेगळा असला तरी थीमबेस लर्निंगवर येथे भर दिला आहे. प्रत्येक इयत्तेनुसार थीम वेगळी आहे परंतु प्रत्येक विषयाचा त्याच्याशी संबंध जोडूनच मुलांना शिकवले जाते. दप्तराच्या ओझ्यातून मुलं मोकळी व्हावीत म्हणून त्यांना पुस्तक नाहीत, तर केवळ वही आणायला सांगितले जाते. ही शाळा डिजिटलाइज असल्याने शाळेत कॉम्प्युटर, एलईडी स्क्रीन, इंटरनेट आदी सर्व सुविधा आहेत.

आपण प्रत्यक्ष जीवन जगत असताना केल्या जाणाऱ्या व्यवहारात्मक कृती विद्यार्थ्यांना योग्य वयात समजाव्या या उद्देशाने चलन व चलनाचा वापर विद्यार्थ्यांना शिकवला गेला, मात्र तोही प्रत्यक्ष कृतीतून. यासाठी शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षक यांनी मिळून खाऊ जत्रेचे आयोजन केले होते. यात विद्यार्थ्यांनी स्टॉलवर विविध खाद्यपदार्थ मांडले होते. मात्र या खाऊ जत्रेमागचा मुख्य उद्देश होता तो विद्यार्थ्यांनी स्वत: चलनाचा वापर करावा. त्यानुसार नफा, तोटा, ग्रॅम, लीटर या प्रमाणित एककांचा वापर करून प्रत्यक्ष व्यवहार मुलांनी केला. या व्यवहारात होणाºया नफातोट्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वीकारली.

बदलत्या काळानुसार मुलांना आधुनिक आणि गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळावे म्हणून आम्ही सर्व शिक्षक कायम प्रयत्नशील असतो. मुलांसाठी विविध उपक्रम राबविले जातात आणि विशेष म्हणजे मुलेही त्यात उत्साहाने सहभागी होतात. परिसरात जाऊन काही गोष्टींची प्रत्यक्ष अनुभवाद्वारे माहिती दिली जाते. स्थानिक ग्रामस्थही सहकार्य करतात.

काही कृती मुलांकडूनच करवून घेतो. - सुधीर भोईर,

मुख्याध्यापकमुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने मुलांना विविध वस्तू तयार करायला प्रोत्साहन दिले जाते. मग ते एखादे खेळणे, चित्र, मूर्ती किंवा बाहुली असो. शाळेतच मुले एकमेकांच्या सहकार्याने आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या वस्तू बनवतात. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या सुंदर कलाकृती शाळेतच मांडल्या जातात. माझे कलादालन हा उपक्रम त्यासाठी सुरू केला असून शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याची कलाकृती त्यात मांडली जाते.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीMaharashtraमहाराष्ट्रthaneठाणे