उल्हासनगरात दिव्यांग साहित्य खरेदीत घोटाळा! बाजारभावापेक्षा पाचपट जास्त किमतीला झाली खरेदी
By सदानंद नाईक | Updated: October 6, 2025 21:36 IST2025-10-06T21:35:47+5:302025-10-06T21:36:23+5:30
चौकशी समितीच्या अहवालात स्पष्ट

उल्हासनगरात दिव्यांग साहित्य खरेदीत घोटाळा! बाजारभावापेक्षा पाचपट जास्त किमतीला झाली खरेदी
सदानंद नाईक, उल्हासनगर: महापालिका दृष्टीहीन दिव्यांग खरेदी प्रकारात घोटाळा झाल्याचे चौकशी समितीच्या अहवालात स्पष्ट झाले. सबंधित अधिकाऱ्यांची याप्रकरणी चौकशीचे आदेश समितीने दिले असून साहित्य पुरविणारा ठेकेदार भाजप पदाधिकारी असल्याचे बोलले जात आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या दिव्यांग विभागाने जुन २०२३ साली दुष्टीहीन दिव्यांगासाठी ८४ साधी व ५४ स्मार्ट काठी खरेदी केली. चौकशी समितीच्या अहवालात या खरेदी प्रकारात घोटाळा झाल्याचे उघड होऊन संबंधितावर कारवाईच्या मागणीने जोर पकडला आहे. महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी अतिरिक्त आयुक्तासह संबंधित अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देऊन, ऐक चौकशी समिती स्थापन केली. समितीने २६ सप्टेंबर २०२५ रोजी अहवाल दिला असून साधी व स्मार्ट काठी पाच पट जास्त किंमतीला खरेदी केल्याचा ठपका ठेवून दिव्यांग विभाग प्रमुख, सहाय्यक आयुक्त व उपायुक्त यांची चौकशीचे मत व्यक्त केले. एकूणच समितीच्या अहवालावरून दिव्यांग साहित्य खरेदीत घोटाळा झाल्याचे उघड झाले. सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील पाटील यांनी दिव्यांग विभागाचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्तासह ठेकेदार हे खरेदी प्रकारात जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाईची मागणी आयुक्ताकडे केली आहे.
उल्हासनगर महापालिका दिव्यांग विभागाच्या साहित्य खरेदी प्रकारात भ्रष्ट्राचार झाल्याचा प्रकार चौकशी समितीच्या अहवालात म्हटले आहे. समितीने २६ सप्टेंबर २०२५ रोजी आयुक्तानी अहवाल सादर केला असून अहवालात खरेदी प्रकारात अनेक त्रुटी असल्याचे सांगून साहित्य बाजारभावा पेक्षा पाच पटी पेक्षा जास्त किंमतीला खरेदीला केल्याचे म्हटले. दिव्यांग विभागाकडून आजपर्यंत खरेदी केलेल्या सर्व प्रकाराच्या खरेदीची चौकशी केल्यास, मोठा घोटाळा उघड होणार असल्याचे बोलले जाते. आयुक्त याबाबत काय निर्णय घेतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दिव्यांग विभाग प्रमुखाची दुसऱ्या विभागात बदली झाली असून अन्य अधिकाऱ्याची चौकशी सुचविले आहे. महिला व बाल कल्याण विभाग, शिक्षण मंडळ या विभाग यामध्येही हीच परीस्थिती आहे. दिव्यांग विभागात स्मार्ट व साधी काठी पुरविणारा ठेकेदार भाजप पदाधिकाऱ्याचा नातेवाईकचा आहे. सर्व व्यवहार हाच पदाधिकारी बघत असल्याची चर्चा आहे.