भिवंडीतील भोसले कुटुंबीयांचे प्रकाश आंबेडकरांकडून सांत्वन

By नितीन पंडित | Published: March 7, 2024 05:08 PM2024-03-07T17:08:59+5:302024-03-07T17:09:46+5:30

पीडित कुटुंबियांसोबत असल्याची ग्वाही देत आंबेडकरांनी घटनेचा निषेध केला.

Sanke Bhosle massacre in Bhiwandi; Vanchit Bahujan Aghadi leader Prakash Ambedkar consoled the family | भिवंडीतील भोसले कुटुंबीयांचे प्रकाश आंबेडकरांकडून सांत्वन

भिवंडीतील भोसले कुटुंबीयांचे प्रकाश आंबेडकरांकडून सांत्वन

भिवंडी - संकेत भोसले हत्याकांडातील पीडित भोसले परिवाराचे सांत्वन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी रात्री उशिरा पीडित भोसले परिवाराला भेट देत वंचित बहुजन आघाडी पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबध्द असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. यावेळी परिसरातील नागरिकांसह तालुक्यातील शेकडो नागरिक कामतघर वऱ्हाळदेवी नगर परिसरात उपस्थित झाले होते. यावेळी वंचित आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर व कार्यकर्ते हजर होते.          

भिवंडीत १४ फेब्रुवारी रोजी अपहरण करून मारहाण झाल्याने उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या संकेत भोसलेंच्या हत्येचे पडसाद भिवंडी शहरासह राज्यात अनेक भागात आंबेडकरी जनतेमध्ये उमटले आहेत.बुधवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास मयत संकेत भोसले याच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे भिवंडी शहरात दाखल झाले त्यावेळी मध्यरात्रीचा वेळ असताना सुद्धा प्रकाश आंबेडकर येणार असल्याने रात्री दहा वाजता पासून ते भेट घेणार असलेल्या वऱ्हाळदेवी नगर येथील बौद्ध विहारा बाहेर हजारोंच्या संख्येने आंबेडकरवादी जनता मोठ्या संख्येने उपस्थित झाली होती.वंचित बहुजन आघाडी पीडित कुटुंबियांसोबत असल्याची ग्वाही यावेळी आंबेडकरांनी देत घटनेचा निषेध केला.

Web Title: Sanke Bhosle massacre in Bhiwandi; Vanchit Bahujan Aghadi leader Prakash Ambedkar consoled the family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.