"परदेशात शोधला असेल राम", संजय राऊत यांचा राज ठाकरे यांना टोला

By अजित मांडके | Updated: March 30, 2023 22:34 IST2023-03-30T22:33:53+5:302023-03-30T22:34:25+5:30

यावेळी राऊतांनी ठाणे शहरातील गुंडगिरीच्या बाबतीत देखिल नाराजी व्यक्त केली. ठाण्यात पोलिसांच्या संरक्षणात गुंडगिरी होत आहे. माझ्याकडे त्याच्या सर्व नोंदी आहेत. ठाण्यातील पोलीस यंत्रणा गुलाम झाली आहे. हे मी पुराव्यानिशी लवकरच जाहीर करीन, असं राऊत म्हणाले.

Sanjay Raut's attack on Raj Thackeray says Ram may be found abroad | "परदेशात शोधला असेल राम", संजय राऊत यांचा राज ठाकरे यांना टोला

"परदेशात शोधला असेल राम", संजय राऊत यांचा राज ठाकरे यांना टोला

ठाणे : आज राम नवमी असताना हिंदू जननायक असणारे परदेशात गेले आहेत. त्यांनी कदाचित परदेशात राम शोधला असेल, असा टोला खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे यांना गुरुवारी लगावला.

आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जांभळी नाका येथील शिवाजी मैदान येथे ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्यावतीने चैत्रनवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या नवरात्रौउत्सवाला खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे याही उपस्थितीत होत्या. 

यावेळी राऊतांनी ठाणे शहरातील गुंडगिरीच्या बाबतीत देखिल नाराजी व्यक्त केली. ठाण्यात पोलिसांच्या संरक्षणात गुंडगिरी होत आहे. माझ्याकडे त्याच्या सर्व नोंदी आहेत. ठाण्यातील पोलीस यंत्रणा गुलाम झाली आहे. हे मी पुराव्यानिशी लवकरच जाहीर करीन, असं राऊत म्हणाले. तर नवनीत राणा यांच्याबाबत बोलतांना सुषमा अंधारे म्हणाल्या की हिंदू शेरनी  असलेल्या राणा यांनी अमरावती मधील मेळघाट येथे 176 बालके मृत्यमुखी पडले आहेत त्या ठिकाणी लक्ष द्यावे.
 

Web Title: Sanjay Raut's attack on Raj Thackeray says Ram may be found abroad