शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

संजय घरत लाच प्रकरण : लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर दबाव?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 6:31 AM

लाचखोरी प्रकरणात अटकेत असलेले केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याशी संबंधित असलेल्या ठिकाणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने छापे टाकले. पण, या कारवाईला ४८ तास उलटूनही एसीबीने कोणतीही माहिती अधिकृतपणे जाहीर केलेली नाही.

कल्याण - लाचखोरी प्रकरणात अटकेत असलेले केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याशी संबंधित असलेल्या ठिकाणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने छापे टाकले. पण, या कारवाईला ४८ तास उलटूनही एसीबीने कोणतीही माहिती अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. घरत यांचे थेट मंत्रालयापर्यंत कनेक्शन असल्याने तपासकामात त्यांच्यावर दबाव येत असल्याची सूत्रांची माहिती आहे.बेकायदा बांधकाम अधिकृत करण्याच्या बदल्यात आठ लाख रुपयांची लाच घेताना घरत यांना अटक झाली आहे. घरत यांच्याबरोबर भूषण पाटील, ललित आमरे हे लिपिक आणि नारायण परुळेकर यांनाही गजाआड करण्यात आले आहे. घरत तपासकामात सहकार्य करत नसल्याचे न्यायालयात सांगण्यात आले आहे. घरत यांचे कार्यालय, घरांवर छापे टाकण्यात आले. त्यात मोठ्या प्रमाणावर घबाड हाती लागले आहे. पालिकेतील काही कागदपत्रे आणि फायली त्यांच्या घरात सापडल्याचीही सूत्रांची माहिती आहे. परंतु, याबाबत तपास यंत्रणांनी मौन बाळगले आहे. घरत यांचे राजकीय पुढाऱ्यांशी लागेबांधे आहेत. थेट मंत्रालयापर्यंत संपर्क असलेल्या घरत यांच्या दालनात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचीही ऊठबस असायची. अतिरिक्त आयुक्तपद घरत यांना मिळवून देण्यात त्यांचीच शिफारस कामाला आली. त्यात, मोजक्याच मंडळींना त्यांच्या दालनात प्रवेश असायचा. यात माहिती अधिकार कार्यकर्त्यांचाही समावेश होता.दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू असलेला तपास पाहता त्यांच्या तपासकामावर दबाव येत आहे की काय, अशी शंका उपस्थित होत आहे. यासंदर्भात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त दीपक दळवी यांनी मात्र दबाव असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला. आमचा तपास सुरू असून योग्य वेळी माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.‘त्या’ तक्रारीचे काय झाले?विवरणपत्रात पत्नीच्या नावाची मालमत्ता दडवल्याप्रकरणी घरत यांच्याविरोधात कल्याणमधील नागरिक सुलेख डोण यांनी नगरविकास विभागाकडे तक्रार केली होती. यावर केडीएमसीला अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले. सध्या घरत यांच्या मालमत्तेसंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरू आहे. संबंधित विभागाने केडीएमसीकडे समन्वयक अधिकारी देण्याची मागणी केली. त्याची प्रशासनाकडून आजवर अंमलबजावणी झाली नाही. डोण यांनी घरत यांच्या पत्नीच्या नावे वाडा तालुक्यातील मौजे केळवण आणि भिवंडी तालुक्यातील मालमत्तेचा विवरणपत्रात उल्लेख नसल्याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.सत्ताधा-यांचे भ्रष्टाचाराला खतपाणीकेडीएमसीमध्ये २० वर्षांहून अधिक सत्ता शिवसेना-भाजपा युतीची राहिली आहे. या कालावधीत मोठ्या प्रमाणावर लाच प्रकरणात अधिकारी आणि कर्मचारी अटक झाले आहेत. परंतु, अद्यापही त्याची मालिका सुरूच असल्याचे घरत यांच्या निमित्ताने पुन्हा समोर आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार अधिकाºयांकडून होत असतानाही यावर ठोस कारवाईची कृती होण्याऐवजी सत्ताधाºयांकडून भ्रष्टाचाराला खतपाणी घातल्याचेच स्पष्ट होत आहे.

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारCrimeगुन्हाkdmcकल्याण डोंबिवली महापालिका