शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत कल्याणच्या साहिलने पटकावले रौप्यपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2019 17:25 IST2019-01-08T17:25:41+5:302019-01-08T17:25:46+5:30

मध्यप्रदेश येथे भारतीय तायक्वांदो फेडरेशन, स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत कल्याणच्या साहिल उमेश घुगेने रौप्य पदक पटकावले

Sahil Ghuge won silver medal in inter School National Taekwondo tournament | शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत कल्याणच्या साहिलने पटकावले रौप्यपदक

शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत कल्याणच्या साहिलने पटकावले रौप्यपदक

कल्याण : मध्यप्रदेश येथे भारतीय तायक्वांदो फेडरेशन, स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत कल्याणच्या साहिल उमेश घुगेने रौप्य पदक पटकावले. 

ठाणे जिल्ह्यांतून साहिल हा एकमेव खेळाडू या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये सहभागी झाला होता. साहिलला या स्पर्धेत अंतिम सामन्यात पंजाबच्या बालविंदरसिंग कडून 20-19 असा निसटता पराभव पत्करावा लागला असला तरी साहिल आंतरराष्ट्रीय तायक्वांदो निवड चाचणीसाठी पात्र ठरला आहे. त्याचे आमदार गणपत गायकवाड, भारतीय तायक्वांदोचे सह सचिव संदीप ओंबासे, तायक्वांदो सचिव रोहित जाधव, प्रशिक्षक रोशन डालवाले, सुदर्शन दुधाने यांनी अभिनंदन केले.

Web Title: Sahil Ghuge won silver medal in inter School National Taekwondo tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :kalyanकल्याण