लिफ्टमध्ये अडकलेल्या चिमुकल्याची सुखरूप सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 13:04 IST2021-06-02T13:04:27+5:302021-06-02T13:04:47+5:30
Thane: लिफ्टमध्ये अडकलेल्या दहा वर्षीय चिमुकल्याची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केल्याची घटना आज ठाण्यात घडली.

लिफ्टमध्ये अडकलेल्या चिमुकल्याची सुखरूप सुटका
ठाणे - लिफ्टमध्ये अडकलेल्या दहा वर्षीय चिमुकल्याची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केल्याची घटना आज ठाण्यात घडली. नौपाडा येथील छेडा अँड छेडा रेंटल हौसिंग बिल्डिंगमध्ये हा प्रकार घडला.
ठाण्यातील नौपाडा येथील विष्णुनगर परिसरात असलेल्या छेडा अँड छेडा रेंटल हौसिंग बिल्डिंगमध्ये स्वयम मयूर महाडिक हा दहा वर्षांचा मुलगा लिफ्टमध्ये अडकला. १३ व्या मजल्यावर तो अडकला होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यानंतर त्यांनी या मुलाची सुखरूपपणे सुटका केली.